• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

गणित अध्यापक मंडळाच्या वतीने 68 प्रज्ञापात्र विद्यार्थ्यांसह 25 गुणवंत शिक्षकांचा सत्कार

ByMirror

Aug 9, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संलग्न अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्राविण्य प्रज्ञा परीक्षेतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा व गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे सल्लागार मच्छिंद्र वीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन दिलीप काटे, अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित उपस्थित होते.


दिलीप काटे यांनी मंडळाला आवश्‍यक ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन देऊन श्रीगोंदा येथे अधिवेशन घेण्याची सूचना मांडली. तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. मंडळाचे सल्लागार प्राचार्य सुनील पंडित यांनी गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला.

. तर राज्यात सर्वात जास्त विद्यार्थी बसवल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन केले. मंडळातर्फे सुमारे 7 हजार 500 विद्यार्थी प्राविण्य परीक्षेत बसले होते. त्यातील 500 मुले प्रज्ञा परीक्षेत उत्तीर्ण झाले, यातून सुमारे 68 विद्यार्थी प्रज्ञापात्र झाल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले.


मंडळातर्फे जिल्हाभरातून सुमारे 25 गुणवंत शिक्षकांचा जिल्हा गुणवंत गणित अध्यापक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक परिषदेच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील पंडित, प्राचार्य दत्तात्रय सस्ते व सुहास आपटे यांनी संघटनेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तर जिल्ह्यातील प्रज्ञाशोध परीक्षेला सर्वात जास्त मुले बसवल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार निक्रड यांना उत्कृष्ठ संघटक म्हणून त्यांना एक हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील 68 प्रज्ञापात्र मुलांचा सत्कार करण्यात आला. यात गोल्डन कॅटेगरीमधून अवधूत चौरे, देवाशिष तोडमल, उत्कर्ष राऊत, सुमेश मुजूमदार यांचा गौरव करण्यात आला. 5 वीच्या 31 तर आठवीच्या 33 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार निक्रड यांनी केले. यावेळी गणित शिक्षक राम मगर, भाऊराव कोतकर, ज्ञानेश्‍वर मेथे, भाऊसाहेब काळदाते व गोरक्ष पळसकर यांनी मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील पंडित, संजयकुमार निक्रड, नवनाथ घुले, राजेंद्र खेडकर, भागवत गायकवाड, बाळासाहेब निवडुंगे, सुहास महाजन, परीक्षा प्रमुख विष्णू मगर, सुखदेव नागरे, राजेंद्र बारगुजे, शहाजी मुन्तोडे, देविदास सातपुते, अतुल पटवा, सचिन कर्डिले, बाबासाहेब दौंड, कल्याण ठोंबरे, सोमनाथ सुंबे, दिलीप रणसिंग, जालिंदर बलमे, नवनाथ साळवे, पांडुरंग बरे, लक्ष्मण गाडेकर, अनिल वाकचौरे, सच्चिदानंद झावरे, सचिन सिन्नरकर, अविनाश बोंद्रे, सुनील करंडे, मिरा जोशी, अनिल बनसोडे, भरत लहाने, भाऊसाहेब इथापे, मयूर परदेशी, राजू पवार आदींनी परिश्रम घेतले. पाहुण्यांचा परिचय राजेंद्र खेडकर यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ घुले यांनी केले. आभार बाबासाहेब दौंड यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *