• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धेत ऐश्‍वर्या शिरवाळेचे यश

ByMirror

Aug 12, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा शुगर (ता. श्रीगोंदा) या शाळेतील विद्यार्थिनी ऐश्‍वर्या हर्षल शिरवाळे हिने केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धेत जवळपास 650 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.


ऐश्‍वर्याला चित्रकलेची आवड असून तिचे अभ्यासातही सातत्य आहे. यापूर्वी देखील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तिने भरघोस असे यश मिळवलेले आहे. ऐश्‍वर्याला या यशात तिचे वर्गशिक्षक रविंद्र होले व तिच्या आईवडिलांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

ऐश्‍वर्याच्या या यशाबद्दल श्रीगोंदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, लिंपणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विजय लंके, शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा शिर्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप कोकाटे, उपाध्यक्ष दत्तात्रय घालमे आदी सर्व सदस्य व शाळेतील शिक्षक हिरवे सर, डोंगरे मॅडम, पाचांगणे मॅडम, गवळी मॅडम, पऱ्हे मॅडम आदींनी विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *