• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

32 कोटीची स्मशानभूमी म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार -सुशांत म्हस्के

ByMirror

Dec 2, 2022

रिपाईत उद्योजक प्रकाश भठेजा यांचा प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- सुडाच्या व जिरवाजिरवीच्या राजकारणाने सर्वसामान्यांची प्रश्‍न दुर्लक्षीत केली जात आहे. जिवंत माणसांना सोयी-सुविधा पुरविण्यापेक्षा मरणानंतरच्या स्मशानभूमीसाठी कोट्यावधी रुपयांची उधलपट्टी करण्यास मनपा प्रशासन सरसावली आहे. सावेडी येथील 32 कोटीची स्मशानभूमी म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. खड्डेमय व धुळीने माखलेले रस्त्यांचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी भलेतच प्रश्‍न गंभीर वाटू लागल्याने या विरोधात रिपाई देखील आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे प्रतिपादन शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील उद्योजक प्रकाश भठेजा यांनी प्रवेश केला. यावेळी म्हस्के बोलत होते. भठेजा यांचे पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दानिश शेख, गुलाम शेख, संतोष पाडळे, जमीर सय्यद, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, सचिन शिंदे, नईम शेख, जमीर इनामदार, निजाम शेख, आजीम खान, ऋषिकेश विधाते, शिवम साठे, बंटी बागवान, जावेद सय्यद, दिनेश पाडळे,भिम वाघचौरे, हुसेन चौधरी, आदिल शेख, सोहेल शेख, उमेश गायकवाड, अक्षय चाबुकस्वार, आदेश पाडळे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


पुढे म्हस्के म्हणाले की, रिपाई हा सर्व समाजाला बरोबर घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करत आहे. सर्व समाजातील नागरिकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना प्रकाश भठेजा म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाला फक्त वोट बँक म्हणून पाहिले जाते. त्यांचे प्रश्‍नांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. रिपाईच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु असून, पक्षाच्या समतेच्या विचारधारेने पक्षाशी जोडलो गेले असल्याचे त्यांनी सांगितले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *