• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

सामाजिक ऋण नि:स्वार्थ भावनेने फेडणारा अवलिया

ByMirror

Feb 15, 2023

सामाजिक कार्याला भक्तीची जोड देत सुसंस्कारित पिढी घडविण्याचे विजय भालसिंग यांचे कार्य

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृतीत माता – पिता, गुरुजन, मातृभूमि याच्या प्रमाणे समाजाचेही ऋण मानले जाते . त्यामुळे प्रत्येकाने समाजातील गरजू व्यक्तीला मदत करावी अशी शिकवण आपली संस्कृती देते. हेच विचार आपल्या कृतीत उतरवून सामाजिक बांधिलकी जपत सामार्जिक कार्यकते तथा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग निस्वार्थ भावनेने योगदान देत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राज्य संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कौतुक करुन पुढील सामाजिक वाटचालिस शुभेच्छा दिल्या आहेत.


सामार्जिक कार्याला भक्तीची जोड देत सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी त्यांचे कार्य अविरत सुरु आहे. नगर तालुक्यांतील वाळकी गावात अत्यंत गरिब शेतकरी कुटुंबांत जन्माला आलेले विजय भालसिंग यांनी हलाखिच्या परिस्थितीचे चटके सोसले. गरिब परिस्थितीतून पुढे आलेल्या भालसिंग यांनी कधी समाजाशी नाळ तुटू दिली नाही. समाजाला हेवा वाटेल असे सामार्जिक कार्य त्यांनी उभे केले. वाळकीच्या पंचक्रोशित सामाजिक कार्याने त्यांनी आपला ठसा उमटवला. एस.टी. बॅकेची नोकरी सांभाळत पोटाला चिमटा देऊन त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना नाशिक जिल्हातील लासलगांव मधील जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रमास दहा वर्षापूर्वी संगणक संच भेट देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या भावनेने त्यांनी संगणक उपलब्ध करून दिले. शिक्षणाला भक्तीची जोड देत अनेक टाळजोड दिले.


अनाथ अपंग वधू – वरांच्या लग्न कार्यासाठी ते नेहमीच मदत करत असतात. तर गरजू घटकातील अपघात ग्रस्तांना आधार देण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. श्रीरामपूर येथील साई विठ्ठल अनाथ विद्यार्थी आश्रमास आमरस भोजून देवून ते निराधार अनाथ मुलांसंगे रममान होवून अनाथ मुलांच्या चेहर्‍यांवर हास्स फुलविले. वारकरी मंडळीची ते उत्तम प्रकारे सेवा करतात. गावातील वयोवृद्ध अनाथ व्यक्तीस दररोज जेवण देऊन त्यांच्या आखेरच्या श्‍वासापर्यत सेवा केली. दरवर्षी महाराष्ट्र दिना निमित्त पोलिस दलातील अधिकार्‍याचा ते सन्मान करतात. शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचाही सन्मान करतात. महिला दिना निमित्त महिला भगिणीचा सन्मान करतात असे विविध उपक्रम रांबवून धार्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य जोमाने चालू आहे. गावातील पुरातन महादेव मंदिरात नंदीची मूर्ती स्वखर्चाने बनवून प्राणप्रतिष्ठा केली. पुरातन ऐतिहासिक बारवेचा गाळ काढून बारव पुनरूज्जीवित केली. गावात महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत सुरु ठेवली. स्वयंभू गौरी शंकर मंदिराच्या सभामंडपास आकर्षक रंगरंगोटी केली. वाळकी पंचक्रोशीतील अपघाताला कारणीभूत असलेले खराब रस्ते दुरुस्त होण्यासाठी संबंधित विभागाला निवेदन देऊन व पाढपुरावा करून रस्त्याचे कामे मार्गी लावण्यास पुढाकार घेतला. धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा पुढाकार असतो.


अशा या सच्चा समाजसेवकाला निस्वार्थ भावनेने केलेल्या समाजसेवेचे फळ विविध क्षेत्रातून राज्यस्तरीय पुरस्काराने मिळाले आहेत. त्यांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मराठाभूषण पुरस्कार, महाराष्ट्र विभूषण पुरस्कार, अनाथांचे कैवारी पुरस्कार, उमाजी नाईक शूरवीर पुरस्कार, सामाजिक एकता शक्ती पुरस्कार, ज्ञान माऊली पुरस्कार, गौरव पुरस्कार, ज्ञानज्योती सावित्री ज्योतिबा पुरस्कार, क्रांतिवीर लहुजी वस्ताद पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार, छत्रपती शंभूराजे पुरस्कार, समाजसेवक मनिभाई देसाई पुरस्कार, पत्ररत्न पुरस्कार, रक्तदान केल्याने महापालिकेतून गौरव पुरस्कार या पेक्षाही विविध पुरस्कार मिळवून वाळकी जन्म भूमि गावचे नांव संपूर्ण राज्यांत कानाकोपर्‍यात पोहचवले आहे. समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी व सुसंस्कांरित पिढी घडविण्यासाठी त्यांचे अहोरात्र कार्य सुरु आहे .

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *