• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी सोमवारी बालदिनाचे आयोजन

ByMirror

Nov 11, 2022

चाईल्ड लाईन, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा संयुक्त उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईन, मराठी पत्रकार परिषद व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी बालदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त सोमवार दि.14 नोव्हेंबर रोजी लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. तसेच यावेळी चाईल्ड लाईन से दोस्ती सप्ताहाचे प्रारंभ करुन असंघटित, शालाबाह्य, आर्थिक दुर्बल व बालकामगार असलेल्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमास जिल्हा प्रशासन व पोलीस दलातील अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात झोपडपट्टीमधील असंघटित, शालाबाह्य, आर्थिक दुर्बल असलेले बालके सहभागी होणार आहेत. बालकांचे अधिकार व हक्कांच्या जागृतीसाठी शहरात चाईल्ड लाईनच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्नेहालयाचे संचालक हनिफ शेख, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश सुर्यवंशी व बाल संरक्षण कक्षाचे वैभव देशमुख यांनी दिली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *