• Sat. Jun 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शहरातून निघाली शोभायात्रा

ByMirror

Jul 29, 2022

पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत भाविकांचा सहभाग

पोतराजांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष

अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने शहरातून लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत पोतराजसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोड्यांच्या बग्गीत असलेली लक्ष्मीमातेची मुर्तीने सर्वांचे लक्ष वेधले. भंडार्याची उधळण करीत भाविकांनी लक्ष्मीमातेचा जयघोष केला.


आषाढी महिन्याच्या शेवटी अमावस्येला दरवर्षी रामवाडी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन केले जाते. नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. रामवाडी येथून या शोभायात्रेचा प्रारंभ झाला होता. संबळ, हलगी, ढोल व ताशांच्या निनादात पोतराजांनी स्वत:वर आसूडचे फटके ओढले. भाविकांसह युवकांनी भक्तीगीतांवर ठेका धरला होता. पारंपारिक वाद्यांनी संपुर्ण परिसर दणाणून निघाला. ही शोभायात्रा मंगलगेट, सर्जेपुरा, अप्पूहत्ती चौक येथून मार्गक्रमण होऊन रामवाडी येथे समारोप झाला.


शोभायात्रेच्या आदल्यादिवशी महालक्ष्मी मातेच्या मुर्तीस अभिषेक घालून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. दुपारी भाविकांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसह रामवाडी परिसरातील नागरिकांनी भंडार्‍याचा लाभ घेतला. हा उत्सव पार पाडण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे, संजय परदेशी, सतीश साळवे, दीपक सरोदे, संकेत लोखंडे, दिपक साबळे, सतीश लोखंडे, अश्‍विन खुडे, अमोल लोखंडे, किशोर फुलारे, अमित कांबळे सर्व रामवाडी मित्र मंडळाच्या युवकांनी परिश्रम घेतले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *