• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

लंडन किड्स प्री स्कूल व ज्ञानसाधना गुरुकुलचे स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Jan 13, 2023

सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल व ज्ञानसाधना गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नाटिका, नृत्य अशा कार्यक्रमाबरोबरच समाजप्रबोधनपर कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.


सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा! हा देण्यात आला. लहान लहान मुलांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित नागरिक व पालक वर्ग मंत्रमुग्ध झाले.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन किसन भाऊ हासे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, संभाजी पवार, नगरसेवक अमोल येवले, आनंद हासे, जालिंदर कोतकर, माजी नगरसेवक सुनील कोतकर, बाळासाहेब कोतकर, संचालक भैरू कोतकर, सचिव स्वप्नील इथापे, सुमित लोंढे, अनिकेत साकोरे, देवराव भोईटे, शंकर बोरुडे, विठ्ठलराव भोर, दत्तात्रय साकोरे, सोनूभाऊ घेंबुड, संग्राम कोतकर, सचिन दारकुंडे, अजय भापकर, संस्थेचे अध्यक्ष दिपक तागडे, सचिव संदीप भोर, संचालक प्रसाद जमदाडे, मुख्याध्यापक रुचिता जमदाडे आदी उपस्थित होते.


किसन हासे म्हणाले की, लहान मुलांवर संस्कार रुजवून त्यांचे भवितव्य घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. लहान वयातच मुलांच्या भवितव्याचा पाया रचला जातो. आजची लहान मुले उद्याचे भविष्य आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास सक्षम समाज घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शेख, शबाना शेख, निशा गायकवाड, कल्याणी लोळगे, पल्लवी पाटील, सुप्रिया मुळे, मेधा कुलकर्णी, मिनाज पठाण, वाघमारे मावशी यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *