• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास सहा महिने पूर्ण

ByMirror

Jan 20, 2023

आमदार संग्राम जगताप यांची अन्न छत्रास भेट

लंगर सेवेचे योगदान शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कोरोनाच्या संकटकाळापासून अविरतपणे भुकेल्यांना जेवण पुरविणार्‍या व कोरोनानंतर देखील गरजूंची अन्नाची गरज भागविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास सहा महिने पूर्ण झाले. यानिमित्ताने आमदार संग्राम जगताप यांनी अन्न छत्रालयास भेट देऊन सेवादारांच्या कार्याची माहिती घेतली.


आमदार जगताप यांचे लंगर सेवेचे जनक आहुजा यांनी स्वागत करुन सत्कार केला. यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, निखील वारे, बाळासाहेब पवार, ठाकुर नवलानी, हरजितसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, रवी बक्षी, प्रितपालसिंह धुप्पड, प्रशांत मुनोत, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, दलजितसिंह वधवा, अंकुश चुत्तर, सुरेश बनसोडे आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, लंगर सेवेचे सर्व सामाजिक उपक्रम दिशादर्शक राहिले आहे. समाजातील गरजूंना लंगर सेवेने आधार देण्याचे काम केले. मानवसेवेचे कार्य उभे करुन त्यांनी दिलेले योगदान शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. भुकेलेल्यांना तृप्त करुन, गरजूंना सेवा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.


जनक आहुजा यांनी तारकपूर येथील अन्न छत्रालयाच्या माध्यमातून खासगी व सरकारी हॉस्पिटलच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळत आहे. तर तारकपूर बस स्थानक येथील गरजू प्रवासी देखील याचा लाभ घेतात. सर्व सेवादारांनी माणुसकीच्या भावनेने सुरु केलेली सेवा कोरोनानंतर देखील अविरत सुरु ठेवली असून, याचा गरजूंना लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *