• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

भाऊसाहेब फिरोदियात बालदिनानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

ByMirror

Nov 16, 2022

जीवनात यश मिळविण्यासाठी आत्मविश्‍वास गरजेचा -उल्हास दुगड

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये विविध क्षेत्रात यश संपादन करणार्‍या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा गौरव करुन बालदिन साजरा करण्यात आला. पालक शिक्षक संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेचे प्राचार्य तथा पालक शिक्षक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष उल्हास दुगड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कैलास दहातोंडे, सहसचिव सारिका साठे उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


प्रारंभी पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सुलभा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात स्वतंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यावर प्रकाश टाकून पाहुण्यांचे स्वागत केले.


कैलास दहातोंडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करुन शिक्षणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहावे. शिक्षण म्हणजे भविष्यात नोकरी मिळविण्याचे साधन नसून, शिक्षणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. युवकांच्या हातात भारताचे भविष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य उल्हास दुगड म्हणाले की, जीवनात यश मिळविण्यासाठी आत्मविश्‍वास गरजेचा आहे. यशाचे शीखर गाठताना जिद्द, चिकाटी, मेहनत व सचोटी हे प्रत्येक टप्पे असून, हे गुण आत्मसात केल्याशिवाय यश मिळणे अशक्य आहे. महत्त्वकांक्षा व वक्तशीरपणा अंगीकारुन जीवनातील ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले. तर सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनवर झालेल्या भाषणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुषमा चिटमिल, पयवेक्षक रावसाहेब कासार, रावसाहेब बाबर, आशा सातपुते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री कुलकर्णी व सविता जासूद यांनी केले. आभार शैला औटी यानी मांनले. तर या कार्यक्रमाचे संयोजन पालक शिक्षक संघाच्या सचिव शोभा पालवे यांनी केले होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *