• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

बटरफ्लाय नर्सरीच्या चिमुकल्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

ByMirror

Jan 22, 2023

वार्षिक स्नेहसंमेलनात बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- भुतकरवाडी येथील बटरफ्लाय नर्सरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नाटिका, नृत्य अशा विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.


स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रा. मंगल भोसले व आप्पादास सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी ज्योती आरगडे, मनिषा कराळे, मयुरी शिंदे, बटरफ्लाय नर्सरीच्या संचालीका आश्‍विनी वाघ, अनिता गणगे, निशा गोर्डे, प्रियंका पवार, पुजा सोनवणे, शितल वैरागर, निकिता कदम, कविता जाधव, अमृता जगताप, स्नेहल चव्हाण, अर्चना लेंडकर, मिनाक्षी देशपांडे, अनिता चव्हाण, आश्‍विनी घुले आदी उपस्थित होते.


प्रा. मंगल भोसले म्हणाल्या की, पूर्वप्राथमिक शिक्षणातून संस्कार व भविष्याचा पाया रचला जातो. मुलांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी संस्कारक्षम शिक्षणाची गरज आहे. सुसंस्कारी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचा विकास साधला जाणार आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी बटरफ्लाय नर्सरीच्या माध्यमातून मुलांना संस्कारमय ज्ञान मिळत असल्याचे सांगितले. तर मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना मैदानी खेळ व विविध कला-गुणांमध्ये रममाण करण्याचे त्यांनी आवाहन केले.


प्रास्ताविकात आश्‍विनी वाघ यांनी मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी बटरफ्लाय नर्सरी योगदान देत आहे. मुलांमध्ये संस्कार रुजवून त्यांना पुस्तकी ज्ञान व व्यावहारिक ज्ञानाचे धडे दिले जात आहे. हसत-खेळत शिक्षण याप्रमाणे विविध खेळातून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्यात गोडी निर्माण केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अनिता गणगे यांनी नर्सरीच्या उपक्रमाची माहिती दिली.


लहान लहान मुलांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित नागरिक व पालक वर्ग मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. शंकर गणगे महाराज यांनी केले. आभार ज्योती आरगडे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *