• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात माझी माती, माझा देश अभियानातंर्गत शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा गौरव

ByMirror

Aug 9, 2023

मिट्टी को नमन, वीरों का वंदन! या घोषवाक्यासह गावातून निघाली तिरंगा रॅली

केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगरचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगरच्या वतीने माझी माती, माझा देश अभियानातंर्गत वीर पत्नी व शहीद जवानांचे भाऊ यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन त्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित अधिकाऱ्यांसह, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांनी पंचप्रण शपथ घेतली. तर गावातून मिट्टी को नमन, वीरों का वंदन! या घोषवाक्यासह हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. भारत माता की जय…, वंदे मातरम… च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.


प्रारंभी शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी फणीकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी वनक्षेत्रपाल हेमंत उबाळे, सरपंच लता अरुण फलके, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, वनरक्षक अफसर पठाण, माजी सभापती रामदास भोर, डोंगरे संस्थेचेच अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, सुरेश खामकर, नवनाथ विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, अरुण फलके, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नलिनी भुजबळ, अतुल फलके, निळकंठ वाघमारे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तृप्ती वाघमारे, अमोल वाबळे, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, प्रमोद थिटे आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गावातील शहीद स्मारक येथे वीर जवानांना नमन करुन, नवनाथ विद्यालय व स्मारक परिसरात वीर पत्नी कांताबाई शिवाजी फलके व वीर जवानाचे बंधू मच्छिंद्र जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर वीर पत्नी व वीर जवानाचे बंधू यांचा शासनाच्या वतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.


नवनाथ विद्यालयात घेण्यात आलेल्या चित्रफला, निबंध व देशभक्तीवर गीत गायन स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामधील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. सर्वांनी हातात माती घेऊन प्रतिज्ञा केली. तर गावातून शालेय विद्यार्थ्यांसह तिरंगा रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी तिरंगे ध्वज घेऊन जोरदार घोषणा दिल्या. तिरंगा रॅलीने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले.


प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, देशासाठी बलिदान दिलेल्यांचे ऋण न फेडता येणारे आहे. त्यांच्या स्मरणाने देश कार्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे सांगून, त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या गावातील शहीद जवानांची माहिती दिली.
फणीकुमार म्हणाले की, देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृती स्फुर्ती व प्रेरणादायी आहे. या वीरांच्या स्मृतीला नमन करुन सक्षम भारत उभा राहत आहे. सिमेवर जीवाची बाजी लावून देश सेवा करणारे जवान खरे हिरो असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून देशसेवेसाठी प्रेरणा घेण्याचे त्यांनी आवाहन केले. या उपक्रमास ग्रामपंचायत, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ विद्यालय, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे सहकार्य लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *