• Sat. Jun 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

नवनाथ विद्यालयात माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन

ByMirror

Aug 6, 2022

स्व.दादापाटील शेळके यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले -साहेबराव बोडखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात लोकनेते माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन करण्यात आले. नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक असलेले स्व. शेळके यांच्या जयंतीनिमित्त नवनाथ विद्यालय व स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे यांच्या हस्ते स्व. दादापाटील शेळके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, अशोक डौले, तुकाराम खळदकर, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, लहानू जाधव, संदिप डोंगरे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


साहेबराव बोडखे म्हणाले की, स्व.दादापाटील शेळके यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. सर्वसामान्यांना त्यांनी नेहमीच आधार देण्याचे काम केले. सध्याचे राजकारण स्वहितासाठी केले जात असून, दादापाटलांनी सर्वसामान्य जनतेचे भल हेच विचार व ध्येय ठेऊन काम केले असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक संस्था उभारणीसाठी स्व.दादापाटील शेळके यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्व.दादापाटील शेळके यांनी जनतेची सेवा केली. सत्तेसाठी त्यांनी कधी निष्ठा व विचारांशी तडजोड केली नाही. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी तत्कालीन शिक्षण मंत्र्यापुढे आग्रह धरुन संस्थेला मान्यता आनली. आज या संस्थेतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले असून, ते विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आभार चंद्रकांत पवार यांनी मानले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *