• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद

ByMirror

Jun 13, 2023

सुरभी हॉस्पिटल मध्ये विविध तपासण्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात सुरु असलेल्या मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या पार्श्‍वभूमीवर सुरभी हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान तपासणी, उपचार व मोफत शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


शिबिराचे उद्घाटन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अनिकेत कराळे यांच्या हस्ते झाले. यावेळी यावेळी डॉ. वैभव अजमेरे, डॉ. अमित भराडिया, डॉ. विलास व्यवहारे, डॉ. अमित पवार, अ‍ॅड. गणेश शेंडगे, डॉ. चंद्रशेखर जंगम, आदी उपस्थित होते.


अनिकेत कराळे म्हणाले की, सर्वांचे निरोगी आरोग्य व व्याधीमुक्त जीवन करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष योगदान देत आहे. सर्वसामान्य गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या रोगांवर उपचार व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत होण्याच्या उद्देशाने घेतलेल्या शिबिराला गरजूंचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात सुरभी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.


मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 ते 15 जून दरम्यान मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर सुरु आहे. 14 जून रोजी नगर मनमाड रोड, सावेडी येथील गरुड कॅन्सर सेंटर येथे कॅन्सर तपासणी, मार्गदर्शन, शस्त्रक्रिया व केमोथेरपी केली जाणार आहे. या शिबिराचा समारोप 15 जून रोजी पाईपलाईन रोड, तुळजाभवानी मंदिर समोरील साई माऊली हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराने होणार असल्याची माहिती चंद्रकांत (काका) शेळके यानी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *