• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हा क्रीडा कार्यालयात पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

ByMirror

Apr 14, 2023

नगरच्या मातीत खेळाडू घडविण्यासाठी डोंगरे यांचे कार्य कौतुकास्पद -ज्ञानेश्‍वर खुरांगे

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयात नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अविनाश साठे, प्राचार्य रामनाथ खतोडे, सुनिल शिरसाठ, जगदाळे आदी उपस्थित होते.


राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे म्हणाले की, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्रात नाना डोंगरे यांचे निस्वार्थपने योगदान सुरु आहे. कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी नव्याने स्थापन झालेले नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून नवीन मल्लांना प्रोत्साहन मिळणार आहे. नगरच्या मातीत खेळाडू घडविण्यासाठी डोंगरे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, शहरी व ग्रामीण भागात कुस्ती स्पर्धांचे आयोजन करून युवकांमध्ये खेळाडूवृत्ती वाढीस लागण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली आहे. कुस्तीबरोबरच इतर मैदानी खेळ देखील खेळविण्यात येणार आहे. कुस्तीमध्ये उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याचा कुस्तीगीर संघाचा मानस असून, मुलींना कुस्ती खेळासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *