• Thu. Oct 16th, 2025

के. बालराजू यांचा सिंगापूरला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मान

ByMirror

Nov 25, 2022

स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी घडवित असलेल्या कार्याची दखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थी घडवून त्यांना तणावमुक्त व प्रभावी तंत्राने मार्गदर्शन करणारे के. बालराजू यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिने अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते बालराजू यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


के. बलराजू स्पर्धा परीक्षांच्या तयारी दरम्यान विद्यार्थ्यांना ताण-तणाव हाताळण्यासाठी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रभावी तंत्राने शिक्षण देत आहे. ते एक प्रेरक वक्ता आणि प्रशिक्षक असून, प्रल्हाद गुरुकुल एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत.

आंतरराष्ट्रीय किर्तीचे लेखक ब्रेन ट्रेसी यांच्या द सिक्रेट्स ऑफ वेल्थप्रेन्युअरचे ते सहलेखक असून, हे पुस्तक लवकरच जगभरात प्रसिद्ध होणार आहेत. ते शहरात विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सोप्या पध्दतीने मार्गदर्शन करतात.


बालराजू यांच्या या कार्याची दखल घेऊन माय एफएमच्या वतीने नुकतेच ग्रँड कॉप्थॉर्न वॉटरफ्रंट येथे आयोजित द अचिव्हर्स अवॉर्ड्स- सिंगापूर 2022 मध्ये कॉर्पोरेट जगतातील 65 हाय-फ्लायर्सचा सन्मान सोहळ्यात त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सर्व क्षेत्रातील सर्वांत आश्‍वासक दूरदर्शी, नवकल्पक आणि उद्योजकांना ओळखण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *