• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

डॉ. पियुष पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

ByMirror

Dec 1, 2022

मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या हस्ते होणार गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ. पियुष रवींद्र पाटील यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. पियुष पाटील


रविवार (दि.4 डिसेंबर) सावेडी येथील माऊली सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते डॉ. पियुष पाटील यांना पुरस्कार दिला जाणार आहे. डॉ. सुधा कांकरिया यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमासाठी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नागेबाबा उद्योग समूहाचे कडूभाऊ काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, आरोग्य व प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉ. पियुष पाटील सावेडी येथील प्राईम केअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करीत आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन देण्याचे काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *