• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावातील जिल्हा परिषदेच्या जगदंबा क्लास प्राथमिक शाळेस टेबल भेट

ByMirror

Dec 8, 2022

मिशन आपुलकी अंतर्गत शालेय शिक्षकांचे योगदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जिल्हा परिषदेच्या जगदंबा क्लास प्राथमिक शाळेस मिशन आपुलकी अंतर्गत टेबल भेट देण्यात आले. शालेय शिक्षक किशोरी भोर व राजेंद्र वाबळे यांनी दहा हजार रुपये किमतीचे दोन टेबल देऊन मिशन आपुलकीत सहभाग नोंदविला.


जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला मिशन आपुलकी उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे. या उपक्रमातूनच प्रेरणा घेऊन जगदंबा क्लास प्राथमिक शाळेचे दिव्यांग तंत्रस्नेही शिक्षक वाबळे व उपक्रमशील शिक्षिका भोर यांनी शाळेस टेबल भेट दिले.


जगदंबा क्लास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कानिफनाथ गुंजाळ यांनी दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन करून, हे कार्य निश्‍चितच समाजासाठी उपयुक्त व सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शाळेतील इतर शिक्षकांनीही मिशन आपुलकी उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. केडगाव बीटच्या विस्तार अधिकारी श्रीमती साठे मॅडम, केडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप दहिफळे व नगरसेवक मनोज कोतकर यांनी या उपक्रमाचे व दोन्ही शिक्षकांचे कौतुक केले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *