• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

उन्नत चेतना लोकशाहीसाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

ByMirror

Dec 24, 2022

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व प्रेरणेने व्होटमाफीया व भ्रष्टाचारींना धडा शिकविण्याची मोहिम

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व प्रेरणेने देशातील लोकशाहीचे रूपांतर उन्नत चेतना लोकशाहीमध्ये करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने पुढाकार घेतला आहे. व्होटमाफीयांना घरचा रस्ता दाखवून शासकीय कामातील अनागोंदी व भ्रष्टाचार थांबविण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.


स्वातंत्र्याच्या 75 वर्षात सातत्याने मतदारांना पैसे देऊन किंवा कोंबडी, दारुचे अमिष दाखवून मागच्या दाराने वोट माफिया सत्तेत येतात. सत्तेत आल्यावर पुढची पाच वर्षे जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारतात, त्यामुळे देशांमध्ये बेरोजगारी दारिद्रय, रस्त्यावरील खड्डे, बेघरांचे प्रश्‍न, झोपडपट्ट्या, गुन्हेगारी व गुंडागर्दी वाढली आहे. हे सर्व गोष्टींची सोडवणूक करण्यासाठी देशातील प्रत्येकाकडे उन्नत चेतना असली पाहिजे. विशेष म्हणजे देशातूनच उन्नत चेतनेद्वारे कायद्याचे राज्य राबविण्यासाठी प्रत्येक मतदाराने चांगल्या उमेदवाराला निवडून दिले पाहिजे. अशा वेळेस मतांचे पैसे सक्तीने घेण्यात भाग पाडणार्‍या उमेदवारांचे पैसे, कोंबडी पचवून मतदारांनी जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राचा वापर करून वोट माफीयांना सार्वजनिक जीवनातून खड्यासारखे बाजूला करण्यासाठी या मोहिमेच्या माध्यमातून संघटना प्रयत्नशील राहणार आहे.


भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चे काढून किंवा आंदोलन करून फारसा उपयोग होत नाहीत. नव्याने येणारे प्रत्येक सरकार भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवीत गुंतलेले आढळून येत असल्याचा संघटनांचा आरोप आहे. यासाठी कॉन्टम फिजिक्स मधील निरीक्षकाचा परिणाम तंत्राचा वापर करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


मानवी जातीच्या दोन हजार वर्षाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांसारखा उन्नत चेतनेचा शासक, प्रशासक झाला नाही. त्यामुळे प्रत्येक मतदाराने शिवाजी महाराजांचे किमान गुण घेऊन डिच्चू कावा करण्याची गरज आहे. त्यातूनच जनतेच्या तिजोरीतील 70 टक्के निधी विकास कामासाठी वापरता येईल आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात थांबविता येईल. त्याचबरोबर उन्नत चेतना असलेल्या उमेदवारांना निवडून दिल्यास लोकांची काम चांगल्या रीतीने होऊ शकणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.


शिवाजी महाराजांच्या आचार विचारातील किमान बाबी प्रत्येक मतदाराने स्वीकारून राबविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक संब्बन, अर्शद शेख, कॉ. महेबूब सय्यद, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, ज्ञानदेव काळे आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *