• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

इंदिरानगरला रावण ऐवजी ईव्हीएम राक्षसाचे दहन

ByMirror

Oct 6, 2022

लोकशाही वाचवण्यासाठी भारत जोडो…, ईव्हीएम फोडोच्या घोषणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाच्या वतीने ईव्हीएममुळे मुक्त, निष्पक्ष, आणि पारदर्शी निवडणुका होत नसल्याचा आरोप करून विजयादशमीला रावण ऐवजी ईव्हीएम राक्षसाचे दहन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेसह लोकशाही वाचवण्यासाठी भारत जोडो…, ईव्हीएम फोडोच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या.


अरणगाव रोड येथील इंदिरानगर येथे झालेल्या प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन दहणप्रसंगी जालिंदर चोभे मास्तर, अशोक सब्बन, सुनिल टाक, गोरख जाधव, अक्षय गायकवाड, अमोल मिरपगार, लक्ष्मण जाधव, दीपक भिंगारदिवे, भाऊ वाघ, प्रकाश कानडे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


ईव्हीएम विरोधी जनजागृती चळवळ राबवून, 2024 च्या निवडणुका इव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर होण्यासाठी नागरिकांना या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. एका बाजूला 8 ऑक्टोंबर 2013 रोजी निकाल द्यायचा आणि दुसर्‍या बाजूला एम विरोधातील याचिका फेटाळायची असा दुटप्पीपणा सर्वोच्च न्यायालयाने केला असल्याचा आरोप चोभे यांनी केला. देशात निवडणुकांचा तमाशा झालेला आहे. भावी पिढ्या या तमाश्यामुळे गुलामगिरीत अडकणार आहे. 2024 नंतर भाजपचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास भयानक पध्दतीने कायदे आणून भावी पिढ्या बरबाद होणार असल्याचे त्यांनी म्हंटले.


ईव्हीएमच्या साह्याने निवडणूक जिंकल्या जात आहे. केंद्रातील सरकार खोक्यांचा पॅटर्न राबवून विरोधात असलेल्या प्रांतीय सरकार पाडण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातील सरकार देखील खोके पॅटर्न ने पाडण्यात आले. ईडी या स्वायत्त यंत्रणेचा राजकारणासाठी गैरवापर सुरु आहे. केंद्रातील भाजप सरकारने घटनात्मक सर्व मर्यादा पायदळी तुडवीत कारभार चालवला आहे. सरकारला सत्ता गमवण्याची भीती वाटत नसून, त्यांची खात्री ईव्हीएमच्या साह्याने मतांच्या हेराफेरीवर आहे. देशातील हुकूमशाही नष्ट करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याची गरज आहे. यासाठी जनतेला रस्त्यावर उतरून लढण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या वतीने करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *