• Wed. Jan 22nd, 2025

हरदिन मॉर्निंग ग्रुपने उभारली आरोग्याची गुढी

ByMirror

Apr 2, 2022

योगा, प्राणायाम व वृक्षरोपणाने मराठी नववर्षाची सुरुवात

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक योगदान देऊन वृक्षरोपण व सदृढ आरोग्यासाठी योग-प्राणायामाची चळवळ चालविणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या बावीसाव्या स्थापना दिनानिमित्त भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये आरोग्याची गुढी उभारुन वृक्षरोपण करण्यात आले. जॉगिंग पार्कच्या हिरवळीवर मराठी नववर्षाची सुरुवात योगा, प्राणायामाने करुन निरोगी व सदृढ आरोग्याचा संदेश देण्यात आला.
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते गुढी उभारुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी योगप्रशिक्षक केवलकृष्ण कनोजीया यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह उपस्थित सदस्यांकडून करुन घेतले. उद्यानात फिरण्यासाठी आलेले नागरिक देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. नागरिकांनी विविध आसने करुन वर्षभर व्यायाम व योग करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी रमेश वराडे, दिपक बडदे, सीए रविंद्र कटारिया, सचिन चोपडा, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, सुंदरराव पाटील, सुभाष गोंधळे, प्रकाश देवळालीकर, जालिंदर बोरुडे, धनंजय नामदे, किशोर भगवाने, अशोक पराते, मनोहर दरवडे, संतोष लुणिया, अभिजीत सपकाळ, सदाशिव मांढरे, दिलीप गुगळे, दिलीप बोंदर्डे, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, दिपक घोडके, सुधाकर चिदंबर, सुमेश केदारे, अविनाश जाधव, विकास निमसे आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर सकाळी व्यायाम व योग केला जातो. या आरोग्य चळवळीची मुहुर्तमेढ पाडव्याच्या मुहुर्तावर बावीस वर्षापुर्वी करण्यात आली होती. ग्रुपच्या माध्यमातून अविरतपणे सामाजिक कार्य सुरू आहे. पर्यावरण संवर्धनासाठी देखील ग्रुपचे सदस्य आपला वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा करतात. विविध सण, उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरे करण्यात येतात. मोफत आरोग्य, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन गरजूंना आधार देण्यात येते. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ततींना एकत्र करुन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरण व आरोग्य चळवळ चालवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


व्हीआरडीईच्या संरक्षण विभागात कार्यरत दिनकरराव धाडगे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याबद्दल तसेच कृषी खात्यातून सेवानिवृत्त झालेले विलास तोतरे यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. हास्ययोगाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात अजय खंडागळे, सुनिल नागपुरे, सुर्यकांत कटोरे, किरण फुलारी, राजू कांबळे, अनंत सदलापूर, विनोद खोत, जयराज आवचर, विठ्ठल राहिंज, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, सुनिल फळे, आजेशपुरी, रमेश त्रिमुखे, दिपक धाडगे, संतोष रासकर, महेश सरोदे, पांडूरंग आटकर, राजू पांढरे, शिरीष वराडे, उत्तम वाघस्कर, पवन वाघमारे, प्रफुल्ल मुळे, अब्बास शेख, रावसाहेब कोकणे, हर्षाली भोसले, सुरेखा आमले, संगीता दरवडे, उषा ठोकळ, मिनाक्षी खोगरे, आरती बोराडे, रोशनी वाघमारे आदी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंद्दूतात्या बेरड, सुधाकर चिदंबर, अनिल तोरडमल, केशव दवणे, प्रविण भोसले, पवन वाघमारे, सचिन कस्तुरे, जालिंदर अळकुटे, संतोष वीर, बापू तांबे, विशाल भामरे, सुनिल भांगे, संदीप शिंगवी, सागर कासवा, राजाभाऊ चेंगडे, स्वराज वाघस्कर, प्रविण परदेशी, जयेश जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *