• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

राहुरीतील कनगर येथे 14 मे रोजी ना. आठवले यांचा नागरी सत्कार

ByMirror

May 4, 2026
मिरजगावात 7 मे रोजी नियोजन बैठक;

मिरजगावात 7 मे रोजी नियोजन बैठक;


दक्षिण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार सोहळा कनगर (ता. राहुरी) येथे 14 मे रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण जिल्ह्याच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, 7 मे रोजी मिरजगाव (ता. कर्जत) येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी ही माहिती देत, या बैठकीला दक्षिण विभागातील सर्व तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


मिरजगाव येथील हॉटेल शिवममध्ये होणाऱ्या या बैठकीत सत्कार सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेऊन विविध जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या जाणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्‍यक नियोजन, कार्यकर्त्यांची भूमिका, तसेच जनसंपर्क मोहीम यावर सविस्तर चर्चा होणार आहे.


या बैठकीसाठी पक्षाचे संपर्कप्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, उत्तर महाराष्ट्राचे नेते राजाभाऊ कापसे, विभागीय अध्यक्ष भीमा बागुल, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.


तसेच जिल्हा नेते अजय साळवे, गणेश कदम, अंकुश भैलुमे, रवींद्र दामोदरे, संजय भैलुमे, दत्ता कदम, जिल्हा उपाध्यक्ष विशाल काकडे, कुंडलिक गंगावणे, अमोल देवळेकर, सतीश भैलुमे, अविनाश भोसले, बाळासाहेब शिंदे, राजा जगताप, राजू उबाळे, बाबा राजगुरू, सतीश मगर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते या बैठकीत सहभागी होणार आहेत.


राहुरी येथे होणाऱ्या नागरी सत्कार सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत असून, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *