• Tue. May 5th, 2026

भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरव

ByMirror

May 4, 2026

कोणत्याही समस्येवरील उत्तर म्हणजे उल्हास दुगड -अशोक मुथा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे सखोल अभ्यासू, खेळाडू व्यक्तिमत्वाने आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता आजपर्यंत नियोजनबद्धतेमुळे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या गुणवत्तेतील प्रगतीचा आलेख उंचावत नेलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व संस्थेस आजही खरोखरच गरज असल्याचे प्रतिपादन अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक मुथा यांनी केले.


भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात मुथा बोलत होते. या सेवापूर्ती सोहळ्यास संस्थेचे खजिनदार प्रकाश गांधी, विश्‍वस्त मंडळाचे सदस्य गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, तसेच अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, माजी मुख्याध्यापक अजय कुमार बारगळ, बाबुराव ठोकळ, विजयकुमार जगदाळे, कुसुम मावची, उपमुख्याध्यापक दत्तात्रय पानमळकर, रावसाहेब बाबर, सुषमा चिटमील, पोपटराव पवार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, बाणेश्‍वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाळासाहेब वाकचौरे, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे उपमुख्याध्यापक कैलास साबळे, पर्यवेक्षक वैभव कुलकर्णी, कल्पना पाठक तसेच शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना मुथा यांनी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या विकासामध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचे सांगून, त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी उल्हास दुगड सरांच्या नियोजनबद्ध कामाचे, प्रामाणिकपणाचे, तत्वांशी तडजोड न करता प्रगतीचा आलेख उंचावत नेणाऱ्या कामाचे कौतुक करून त्यांना त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व संस्थेस उल्हास दुगड सारख्या मुख्याध्यापकांची गरज असल्याचे सांगून, निवृत्तीनंतर त्यांची उणीव भासणार असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.


यावेळी सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, गौरव मिरीकर, मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, माजी मुख्याध्यापक अजय कुमार बारगळ, माजी उपमुख्याध्यापक रावसाहेब बाबर , उज्वला कळमकर, विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, वैभव कुलकर्णी तसेच विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका सुलभा कुलकर्णी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित यांनी आपल्या मनोगतातून सरांच्या विकास कामाच्या आठवणींना उजाळा दिला.


एक आदरयुक्त भीती असणारे, वार्षिक कामाचे उत्तम नियोजन, समान कामाची विभागणी, योग्य पद्धतीने काम करून घेण्याचा हातखंडा असलेले, विद्यार्थी प्रिय, शिक्षक प्रिय, मुख्याध्यापक तसेच राज्य राष्ट्रीय क्रीडा प्रकारात 29 सुवर्ण, 6 रोप्य, 3 कांस्यपदकांची कमाई , नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धा मलेशिया येथे भारताचे प्रतिनिधित्व करणारे तसेच भालाफेक, थाळीफेक, गोळा फेक, तिरंदाजी यामध्ये निष्णात असणारे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीत 1989 रोजी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू होऊन भिंगार हायस्कूलमध्ये उपमुख्याध्यापक तर महेश मुनोत विद्यालय वांबोरी या ठिकाणी मुख्याध्यापक पदाची सूत्रे हातात घेऊन पुन्हा भाऊसाहेब फिरोदिया या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारून एकूण 37 वर्ष कामकाज पाहिले. असे प्रास्ताविकेतून गंधाली पटवर्धन यांनी सरांच्या कामाचा आढावा घेतला.


सत्कारास उत्तर देताना भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांनी आपल्या मनोगतातून अशोकभाऊ फिरोदिया यांनी दिलेल्या संधीमुळे व छायाताई फिरोदिया यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्‍वासामुळेच त्यांनी आपल्या कार्याचा झेंडा कायमच उंचावत ठेवला. पत्नी, मुले, भाऊ-बहीण, शिक्षक वृंद विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे आजपर्यंत ते मुख्याध्यापक पदाची सूत्रे व्यवस्थित सांभाळू शकले.


जैन ओसवाल युवक सेवा संघ ट्रस्ट तर्फे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वासाठी कृतज्ञता पत्र देण्यात आले. सरांसारख्या आदर्श, प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडवले. त्यांच्या प्रेरणेने अनेकांनी यशाची शिखरे पार केली. त्यांच्या मार्गदर्शनाची आजही त्यांच्या विद्यार्थ्यांना गरज आहे. असे उद्गार जैन ओसवाल युवक संघ ट्रस्टचे अध्यक्ष भूषण भंडारी यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अध्यापिका शुभांगी जोशी यांनी केले. आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *