• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा

ByMirror

Mar 8, 2023

आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिलांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला सदस्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी महिलांचा सत्कार केला. यावेळी रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, सुरेश केदारे, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, नामदेवराव जावळे, अभिजीत सपकाळ, प्रवीण परदेशी, दिनेश शहापूरकर, दिलीप गुगळे, विठ्ठल राहिंज, विलास तोतरे, रामनाथ गर्जे, अशोक पराते, राजू कांबळे, किरण फुलारी, माजीद शेख, कुमार धतुरे, शैलेश बोधले, सिद्धू तात्या बेरड, राजू शेख, भाऊसाहेब गुंजाळ, विशाल भामरे, रवी यादव आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, मागील 23 वर्षापासून अविरतपणे ग्रुपचे सामाजिक कार्य सुरू आहे. आरोग्याप्रति जागरूक राहून दररोज सकाळी ग्रुपचे सदस्य योग प्राणायाम करतात. तर वृक्षरोपण व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कार्य सुरु आहे. ग्रुपच्या या कार्यात महिला हातभार लावत आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सामाजिक चळवळीला महिलांच्या योगदानाने गती मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी देखील पहाटेच साजरा झालेल्या महिला दिन कार्यक्रमाचे आनंद द्विगुणीत झाला असून, आनखी सामाजिक कार्य करण्यास बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *