• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविले विजेतेपद

ByMirror

Aug 12, 2023

विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी संघाची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेत केडगाव येथील ओएसिस इंग्लिश मीडियम स्कून विजेतेपद पटकाविले. पहिल्या सामन्यापासून ते शेवट पर्यंत ओएसिसने विजयाची घौडदौड सुरु ठेवली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील 15 शालेय संघांनी सहभाग नोंदवला होता.


पहिला सामना डॉन बॉस्को स्कूल विरुद्ध ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूल असा झाला होता. यामध्ये ओएसिस स्कूलने 5-0 गोल करून विजय मिळवला. दुसरा उपांत्यपूर्व सामना अशोकभाऊ फिरोदिया स्कूल सोबत झाला त्यात 3-2 असा विजय मिळवला. त्यानंतर उपांत्य फेरीची लढत आठरे पब्लिक स्कूल सोबत झाली. यामध्ये 3-1 गोलने ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली.


अंतिम सामना एग्झिलियन स्कूल बरोबर झाला. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 3-1 गोलने ओएसिस स्कूलने विजय संपादन केले. या विजयी संघाची सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडू व प्रशिक्षक सुभाष कनोजीया यांचे भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुरेखाताई भानुदासजी कोतकर, संचालिका वैशालीताई कोतकर, सचिव रघुनाथ लोंढे, प्रिन्सिपल अविराज काळे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *