• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

सावित्री ज्योती महोत्सव व बचतगटांच्या प्रदर्शनाला नगरकरांचा प्रतिसाद

ByMirror

Oct 12, 2022

दिवाळीच्या खरेदीसाठी प्रदर्शनाकडे महिलांचा ओढा

हातसडीच्या तांदुळाची विक्रमी विक्री, तर गीर गायच्या तुपाला मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सव व बचतगटांचे उत्पादनांच्या प्रदर्शनाला नगरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, महिला बचत गटांच्या विविध स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी होत आहे. महिलांना आपल्या व्यवसायाशी निगडीत खाद्य पदार्थ, गृह सजावटीचे साहित्य, हस्तकला, विविध साहित्य, वस्त्रांचे स्टॉल लावले असून, दिवाळीची खरेदीसाठी महिलांचा ओढा या प्रदर्शनाकडे वाढला आहे.


बचत गटाच्या प्रदर्शनात अकोले तालुक्यातील हातसडीच्या तांदुळाची विक्रमी विक्री झाली. तर दिवाळी निमित्त गीर गायच्या तुपाला अधिक मागणी आहे. नाचणीची बिस्किट, विविध प्रकारचे जाम, पापड, चटण्या, लोणचे, मसाले आदी स्टॉलवर खरेदीसाठी ग्राहक वर्ग गर्दी करत आहे.

कर्जतची शिपी आमटी व इतर खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांचीही गर्दी असून, दिवाळी फराळाला देखील चांगली मागणी आहे. मेकअप साहित्य, महिलांचे पर्स, गिफ्ट आर्टीकल्स, गॅझेट, ज्वेलरी, बांगड्या खरेदीसाठी महिला व युवतींचा चांगला प्रतिसाद असल्याची माहिती प्रदर्शनाचे मुख्य संयोजक अ‍ॅड. महेश शिंदे व पोपट बनकर यांनी दिली.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *