• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन रॅलीतून सारसनगरला स्त्री शक्तीचा जागर

ByMirror

Jan 4, 2023

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विधाते विद्यालयाचा उपक्रम

वक्तृत्व स्पर्धेतून फुले दांम्पत्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याला उजाळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कै.दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन रॅली काढण्यात आली. बॅण्ड पथकाच्या निनादात निघालेल्या रॅलीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेतील विद्यार्थीने सर्वांचे लक्ष वेधले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयघोषाने संपुर्ण परिसर दुमदुमले. या रॅलीच्या माध्यमातून मुलगी वाचवा…मुलगी शिकवाचा संदेश देत स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला.


प्रभात फेरीच्या समारोपनंतर विधाते विद्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रम ज्ञानदेव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी संस्थेचे बाळासाहेब विधाते, रामदास कानडे, प्रा. शिवाजीराव विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे केल्याने महिला विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. विविध उच्च पदावर महिला विराजमान असून, याचे श्रेय सावित्रीबाईंना जाते. मुलींनी उच्च शिक्षण घेवून परिस्थितीपुढे न डगमगता आपले ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.


विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेली वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषणे सादर केली. विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाकिसन क्षीरसागर यांनी केले.

स्वागत व प्रस्ताविक सारिका गायकवाड यांनी केले. आभार संतोष सुसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *