जय भिमच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर येथे उभारणीस तात्काळ मंजुरी देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. जय भिमच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले.
रिपाईचे सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात भीमा बागुल, अजय साळवे, विजय पवार, मनोज काळे, रमेश अमोलिक, करण कोळगे, समाधान नरोडे, तबरेज कुरेशी, कुंदन आरोळे, विनायक बोर्डे, जमीर सय्यद, अशोक गायकवाड, सचिन ठोंबरे, राहुल वैराळ, अल्ताफ शेख, अमित काळे, सोमा भागवत, सुनील शिरसाठ, संजय बोरगे, विकास गायकवाड, दीपक थोरात, मार्कस आमळे, सुरेश पंडित, अनिल भोसले, विकी बोर्डे, विजय शिरसाठ, राजू देठे, सागर बोर्डे, विलास साळवे, सुनील चांदणे, किशोर पंडित, सोमा भागवत, स्नेहलताई सांगळे, किरण दाभाडे, नाना पाटोळे आदी सहभागी झाले होते.
श्रीरामपूर शहरातील रेल्वेस्टेशनच्या शेजारी नगर परिषदेचे प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे. नगर परिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होण्यासाठी व पुतळा उभारण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दिला असून, या मागणीसाठी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, विविध पक्ष व संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वारंवार मागणी करूनही, या मागणीकडे श्रीरामपूर नगरपरिषद नेहमीच दुर्लक्ष केले आहे. श्रीरामपूर मधील सत्ताधार्यांनी फक्त राजकारण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणार्या कार्यकर्त्यांना व समाजाला नेहमीच खोटे आश्वासन दिले असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
श्रीरामपूरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे. 8 ऑगस्टला मोर्चा काढून देखील या विषयाची दखल घेण्यात आली नसून, अनेकवेळा पाठपुरावा करुनही मागणी पुर्ण होत नसल्याने समाजात नाराजी पसरली आहे. सत्ताधारींच्या विरोधात सर्वांच्या मनात चीड निर्माण झाली असल्याचे म्हंटले आहे.