• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने दिवंगत नेते आनंद दिघे यांना अभिवादन

ByMirror

Jan 27, 2023

धर्मवीर आनंद दिघे यांचा सामाजिक वारसा मुख्यमंत्री शिंदे पुढे चालवीत आहे -अनिल शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मवीर आनंद दिघे यांचा सामाजिक वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खर्‍या अर्थाने पुढे चालवीत आहे. त्यांची शिकवण अंगीकारून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम राज्यात सुरु आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिघे शेवटच्या श्‍वासा पर्यंत कटिबध्द राहिले. त्यांचे कार्याच्या प्रेरणेने प्रत्येक शिवसैनिक योगदान देत असल्याचे प्रतिपादन शिवसेना (बाळासाहेबांची) जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले.


शहरात शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. आयटीआय महाविद्यालय जवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती जिल्हा कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात जिल्हाप्रमुख शिंदे बोलत होते.

यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक मदन आढाव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे, योगेश गलांडे, महेश लोंढे, सुनिल शेवाळे, अजिंक्य कातोरे, अक्षय ठाणगे, राज कोंडके, प्रल्हाद जोशी, प्रमोद कोरडे, मुकेश जोशी, ओंमकार शिंदे, आनंदराव शेळके आदी उपस्थित होते.


दिलीप सातपुते म्हणाले की, आनंद दिघे समाजसेवेचे वटवृक्ष होते. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती रिकाम्या हाताने परतला नाही. अन्याय, पिडीतांना त्यांनी न्याय मिळवून दिला. ते सर्वसामान्यांचे नेतृत्व होते. समाजसेवेचे व्रत व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन शिवसेनेची (बाळासाहेबांची) वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *