• Fri. Mar 21st, 2025

शहरात शिंपी समाजाचा राज्यव्यापी वधु वर मेळावा उत्साहात

ByMirror

Jun 17, 2022

ऑनलाईन व ऑफलाईन वधु वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यातील समाजबांधवांची हजेरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील समस्त शिंपी समाज बांधवांनी एकत्र येऊन शहरात घेतलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन वधु वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समस्त शिंपी समाज महाराष्ट्र, नामदेव शिंपी समाज डावरे गल्ली, नामदेव शिंपी समाज भिंगार, नामदेव शिंपी समाज शिंदे मळा व समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय सेवाभावी (ऋणानुबंध) वधुवर प्रतिष्ठान भिंगार यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री श्रीकांत मांढरे यांच्या स्मरणार्थ शहराच्या डावरे गल्ली येथील शिंपी समाजाचे विठ्ठल-रुक्मिणी नामदेव मंदिरात वधु वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


अहमदनगर येथील शिंपी समाजाचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे, भिंगारचे अध्यक्ष शैलेश धोकटे, शिंदे मळा येथील शिंपी समाजाच्या उपाध्यक्षा हेमलता वडे यांच्या हस्ते वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुणे येथून समस्त शिंपी समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष रामचंद्र होमकर, सचिव राजेंद्र भुतकर, जयंत पाटणकर, श्रीनिवास रामगीर, राजेंद्र पगारे, अभिषेक हेंद्रे, अक्षय हेंद्रे, पांडुरंग ढमाळ, श्रीरामपूरचे स्वयंवर वधू-वर मेळाव्याचे अध्यक्ष कैलास खंदारे, किरण भांबरे, हेमंत गुजर, शुभमंगल सावधान वधू वर ग्रुपचे अध्यक्ष कमलाकर भुसे, येवला येथून न्यानेश्‍वर टिंबे, परली येथून कैलास धोकटे, शिंदे मळा येथील अनिता वाधवणे, मिरजगावचे संजय चौकटे, अरुण मुळे, सतीश उरणकर, शाम धोकटे, दत्तात्रय वनारसे आदी उपस्थित होते.
श्रीकांत मांढरे म्हणाले की, आजच्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी झपाट्याने बदलत आहे. तरुणाई हे बदल त्वरित अंगीकारत आहे. वधु-वर मेळाव्यात युवक-युवतींना आपला जोडीदार निवडताना योग्य निर्णय घेता येतो. समाज अशा मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र येत असताना अनेकांच्या रेशीमगाठी जुळल्या जात आहे. वधु-वर मेळावे काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविक शैलेश धोकटे यांनी शिंपी समाज महाराष्ट्रासह भारतभर पसरला आहे. कामानिमित्त व्यस्त असलेले कुटुंब लवकर एकत्र येत नाही. त्यामुळे ऑनलाईन व ऑफलाईन वधु वर मेळावा काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. शैलेश गुप्ते यांनी दोन वर्ष कोरोनामुळे समाजाचा कोणताही कार्यक्रम पार पडला नाही. या मेळाव्यात समाजबांधवांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे सांगून, या मेळाव्याची माहिती दिली. या वधू-वर मेळाव्यात ऑनलाईन दोनशे तर ऑफलाईन शंभरपेक्षा जास्त वधु-वरांची नोंदणी होऊन त्यांची प्रत्यक्ष परिचय व मुलाखत घेण्यात आली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास गुजर यांनी केले. संतोष माळवदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्‍वर कविटकर, प्रसाद मांढरे, शरद गीते, अरुण जवळेकर, दीपक बकरे, कैलास गुजर, सुरेश चुटके, दीपक देठे, दिलीप काकडे, राजेंद्र बगाडे, दिलीप गीते, रवींद्र शित्रे, अभिजीत पाडळकर, प्रफुल्ल जवळेकर, गणेश गीते, अजय कविटकर, सुजित चांडवले, मयुर नेवासकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पसायदानाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *