संबळ, हलगी, ढोल व ताशांनी परिसर निनादला
कोरोना महामारी नष्ट होण्यासाठीची केली नवसपुर्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लालटाकी येथे महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.28 जुलै) पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत संबळ, हलगी, ढोल व ताशा आदी पारंपारिक वाद्यांवर भाविकांनी ठेका धरला होता. तर डोक्यावर कलश घेऊन युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पोतराजांचे नृत्य पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. श्री क्षेत्र वरखेडच्या महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
लालटाकी येथील महालक्ष्मी मंदिरात भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव काते व सुशीलाबाई काते यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. होम-हवन होऊन महालक्ष्मी देवीची आरती करण्यात आली. कोरोना महामारी नष्ट होण्यासाठी नागरिकांच्या वतीने महालक्ष्मीचरणी साकडे घालण्यात आले होते. त्याची नवसपुर्ती या यात्रेत मोठ्या उत्साहात करुन सुख, शांती व समृध्दीसाठी प्रार्थना करण्यात आली.
चैत्र महिन्यात श्री क्षेत्र वरखेडच्या महालक्ष्मी देवीची यात्रा उत्सव साजरा होताना संपुर्ण महाराष्ट्रात देवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी भाविक आपल्या पध्दतीने उत्सव साजरा करत असतात. या पार्श्वभूमीवर लालटाकी येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिराचे पूजारी असलेले साहेबराव काते यांच्या अध्यक्षतेखाली हा यात्रा उत्सव पार पडला. पारंपारिक वाद्यांचे गजर व लक्ष्मीमातेच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला होता. लालटाकी ते सर्जेपूरा परिसरातून मिरवणुक काढण्यात आली.
मिरवणुकीच्या समारोपनंतर लालटाकी येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा भाविकांसह परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी कैलास मोहिते, विवेक भोसले, अविनाश भास्कर, संजय वैरागर, विनोद वैरागर, विशाल रोकडे, योसेफ काते, योगेश कांबळे, बहिरनाथ वैरागर, दत्ता जाधव, रमेश वैरागर, राम लोखंडे, सागर काते, दिलीप लोखंडे, मंदा काते, कार्तिका वाघमारे, भारती कुचेकर, गुणाबाई भोसले, छाया त्रिभुवन, आशा मोहिते, हुशा नाडे, हौसाबाई तांबे, लताबाई काते, सोना काते, सुनिता वैरागर, सिताबाई वडागळे, मालन वडागळे आदींसह लालटाकी भारस्कर कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.