घर घर लंगर सेवा व लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवा व लायन्स क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीने शहरातील रक्तपेढींना ऑक्सिजन कॅनचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी शरद मुनोत, डॉ. विजय भंडारी, दिनेश चोपडा, किशोर मूनोत, राजेंद्र ताठेड, बाबुशेठ लोढा, गणेश कांकरिया, सतीश डुंगरवाल, अनिल दुगड, ईश्वर बोरा, प्रशांत मुनोत, राजेंद्र कंत्रोड, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, सुनील छाजेड, विपुल शाह, धनंजय भंडारे आदी उपस्थित होते.
रक्तदान केल्यानंतर काहींना अस्वस्थता वाटल्यास ऑक्सीजन कॅनचा आधार मिळणार आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरात ऑक्सीजन सिलेंडरची व्यवस्था नसते, अशा वेळेस हे ऑक्सीकॅन उपयोगी पडणार असल्याचे आनंदराम मुनोत यांनी सांगितले. आनंदऋषीजी ब्लड बँकच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे गणेश कांकरिया यांनी नियोजन केले होते. प्रास्ताविक हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार सुनिल छाजेड यांनी मानले.