• Mon. Jan 13th, 2025

शहरातील टर्फ क्लबवर डीबीपीए प्रीमियर क्रिकेट लीगचे उद्घाटन

ByMirror

Aug 8, 2022

देसर्डा-भंडारी प्रोफेशनल अकॅडमीचा उपक्रम

सीएचा अभ्यास करणार्‍या युवक-युवतींसह शिक्षकांचे एकूण 28 संघ सहभागी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात देसर्डा-भंडारी प्रोफेशनल अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डीबीपीए प्रीमियर क्रिकेट लीगचे (सिझन 2) उद्घाटन डब्ल्यूआयआरसीचे (वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल) माजी चेअरमन सीए मनिष गदिया यांच्या हस्ते सोमवारी (दि.8 ऑगस्ट) सकाळी झाले. यावेळी अकॅडमीचे सीए संदीप देसर्डा, सीए प्रसाद भंडारी, सीए अमृत पटेल, सीए मिलिंद जांगडा, सीए विजय मर्दा, सीए प्रविण कटारिया, सीए परेश बोरा, सीए किरण भंडारी, सीए धनंजय काळे, सीए प्रसाद पुरानिक, सीए सनित मुथ्था, सीए स्नेहा देसर्डा, सीए काजल चांदे, प्रा. वृषाली गांधी, प्रा. प्रसाद बेडेकर, अ‍ॅड. बुशरा खान, मदनलाल देसर्डा, सचिन देसर्डा, सीए मनिष तिवारी, सीए अभय कटारिया आदी उपस्थित होते.


देसर्डा-भंडारी प्रोफेशनल अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाबरोबर कला, क्रीडा व सांस्कृतिकचे विविध उपक्रम राबविण्यात येतात. तर विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल व्हिजिट देऊन जीएसटी, टॅक्सेसचे प्रत्यक्ष धडे देखील दिले जातात. शिक्षणाबरोबर मैदानी खेळाने विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील 18 वर्षापासून शहरात ही अकॅडमी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून, 500 पेक्षा जास्त अकॅडमीच्या माध्यमातून सीए घडले असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक संदीप देसर्डा व प्रसाद भंडारी यांनी दिली.


बुरुडगाव रोड, साईनगर येथील टर्फ क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा होत असून, यामध्ये सीएचा अभ्यास करणारे अकरावी, बारावीचे महाविद्यालयीन युवक-युवतींसह शिक्षकांचे एकूण 28 संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 10 ऑगस्ट पर्यंत तीन दिवस चालणार असून, यामध्ये 8 युवतींचे तर 20 युवकांच्या संघाचा समावेश आहे. तब्बल 225 खेळाडू यामध्ये सहभागी झाले असून, पहिल्याच दिवसापासून क्रीकेटचा थरार रंगला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *