• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

रतडगाव ग्रामपंचायत व उडान फाउंडेशनच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

ByMirror

Jun 9, 2023

शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण करुन जनतेच्या मनातील स्वराज्य निर्माण केले -आरती शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे एक आदर्श शासनकर्ते ठरले. त्यांनी खर्‍या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करुन जनतेच्या मनातील स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी शौर्य, पराक्रम, ध्येयवाद, कुशल संघटन, सर्वोत्तम नियोजन, मुत्सद्दीपणा व धाडस असे सर्वोच्च गुण एकवटलेले होते. त्यांच्या जीवन कार्यातून आजच्या युवा पिढीने आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे यांनी केले.


रतडगाव ग्रामपंचायत व उडान फाउंडेशनच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी सरपंच शारदाताई वाघुले, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पालवे, ग्रामपंचायत सदस्य सुखदेव दुसुंगे, महादेव चेमटे, शोभा जाधव, संगीता जाधव, आरती शिंदे, संदीप वाघुले, अक्षय शिंदे, संदीप सुरजे, अंबादास निकम, अशोक थोरात, रंजना थोरात आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


भाऊसाहेब पालवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जनतेला न्याय मिळेल या पद्धतीप्रमाणे कारभार केले. महिलांचा नेहमी सन्मान केला. त्यांचे कार्य हे निश्‍चितच आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी जय असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक शिवाजीराव खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, विशाल गर्जे, ज्ञानेश्‍वर खुरांगे आदींचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *