• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

माझी महालक्ष्मी स्पर्धेत जयश्री बडदे यांना सोन्याचे नाणे बक्षिस

ByMirror

Oct 21, 2022

गौरी सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण

हरदिन मॉर्निंग ग्रुप व राष्ट्रवादीच्या वतीने विजेत्या महिलांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- माझी महालक्ष्मी या गौरी सजावट स्पर्धेत भिंगारच्या जयश्री बडदे यांनी प्रथम क्रमांकाचे सोन्याचे नाणे बक्षिस पटकाविले. तर स्वाती श्रीकांत वराडे उत्तेजनार्थच्या मानकरी ठरल्या.


विक्रम चहा तर्फे माझी महालक्ष्मी उपक्रमातंर्गत गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी घरोघरी गौरींची सजावट करुन व सामाजिक संदेश देऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा निकाल जाहीर करुन माणिक चौक येथील प्रतिक एजन्सी येथे विजेत्या महिलांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी एजन्सीचे संचालक दिपक बोरा, विक्रम चहाचे महेश पोखरणा, प्रतिभा बोरा, हररिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, दीपक बडदे, श्रीकांत वराडे, सर्वेश सपकाळ, अभिजीत सपकाळ, रमेश वराडे आदी उपस्थित होते.


या स्पर्धेतील द्वितीय विजेत्या वृषाली शेंडगे यांना पैठणी साडी, तृतीय विजेत्या निलम परदेशी यांना मिक्सर तसेच उत्तेजनार्थ स्वाती वराडे व विजया थोरात यांना आकर्षक बक्षिसं तर सर्व विजेत्यांना विक्रम चहाचे एक किलोचे पाकिट देण्यात आले.

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संजय सपकाळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी विजेत्या महिलांचा सत्कार करुन अभिनंदन केले. जयश्री बडदे यांनी यापूर्वी देखील अनेकवेळा गौरी सजावट स्पर्धेत सहभाग नोंदवून बक्षिसे पटकावली आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *