• Fri. Mar 21st, 2025

महिलांना चुंम्बकीय चिकित्सा शास्त्र, निसर्गोपचार व योगा विषयी मार्गदर्शन

ByMirror

Apr 6, 2022

चुंम्बकीय चिकित्सा शास्त्र शरीराच्या विकारांवर प्रभावी -आरती कर्नावट

अहमदनगर (प्रतिनिधी)- शरीर मुल रुपात एक विद्युतीय संरचना आहे. प्रत्येक मनुष्याच्या शरीरात चुंम्बकीय तत्व जन्मापासून ते मृत्यू पर्यंत असतात. चुम्बकीय शक्ती रक्तसंचार प्रणालीच्या माध्यमातून मानवी शरीरावर प्रभावित करते. शरीराच्या प्रत्येक अवयवांना प्रभावित करण्याची चुम्बक शक्तीत क्षमता असते. चुंम्बकीय चिकित्सा शास्त्राच्या योग्य मार्गदर्शनाने शरीराच्या विकारांवर प्रभावी ठरुन अनेक रोग बरे होत असल्याचे प्रतिपादन आरती दिपक कर्नावट यांनी केले.
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महात्मा फुले चौक येथील सभागृहात महिलांच्या आरोग्यासाठी चुंम्बकीय चिकित्सा शास्त्र, निसर्गोपचार व योगा विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नावट बोलत होत्या. याप्रसंगी स्वप्ना शिंगवी, सल्लागार विद्या बडवे, निसर्गोपचार तज्ञ हेमा सेलोत, दिपा मालू, ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा सविता गांधी, सचिव ज्योती कानडे, सचिव शोभा पोखर्णा, अनिता काळे, सविता गांधी, उज्वला बोगावत, शशीकला झरेकर, चंद्रकला सुरपुरिया, सुजाता पुजारी, दिपा मालू आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना कर्नावट म्हणाल्या की, चुम्बक चिकित्सा पध्दतीच्या वापर सहज व सोपा असून, त्याचा वापर लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक करु शकतात. प्राचीन कालापासून चुंम्बकीय शक्तीचा वापर होत आलेला आहे. अमेरिकेतील न्यूयार्कमध्ये चुंम्बकीय शक्तीच्या वापराने अनेक असाध्य रोग बरे झाल्याचे संशोधनात सिध्द झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर चुंम्बकीय चिकित्सा शास्त्र एखाद्या विकार व रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी शरीरावर कसे काम करतात? याच्या प्रात्याक्षिक दाखवले. मुंबई येथील ई बायोटोरियम या चुंम्बकीय शक्तीवर आधारित कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती दिली.
निसर्गोपचार तज्ञ हेमा सेलोत म्हणाल्या की, शारिरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी निसर्गोपचार हे एक वरदान असून, याच्या योग्य वापराने निरोगी जीवन जगता येते. दैनंदिन प्राणायाम, योगा व सकस आहार घेऊन प्रतिकार शक्ती वाढविण्याचा सल्ला त्यांनी दिला. तर उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी पाण्याचे व मातीचे घरगुती उपचार सांगितले. प्रणिता तरोटे व झोटींग यांच्या योग केंद्राच्या विद्यार्थ्यांनी योगाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच निरोगी व सदृढ जीवनासाठी योगाचे महत्त्व विशद करण्यात आले.


प्रास्ताविकात ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या आरोग्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट करुन पाहुण्यांचे त्यांनी स्वागत केले. दीपा मालू यांनी महिलांसाठी विविध बौध्दिक स्पर्धा घेतल्या. बौध्दिक, प्रश्‍नमंजुषा, तंबोला आदी विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यामध्ये वैशाली आपटे, उषा गुगळे, सरस पितळे, अरुणा गांधी, शारदा नहार यांनी बक्षिसे पटकावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या बडवे यांनी केले. आभार ज्योती कानडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *