• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर करीत रंगला जिव्हाळा ग्रुपचा हळदी-कुंकू कार्यक्रम

ByMirror

Jan 15, 2023

मराठमोळ्या वेशभुषेत अवतरलेल्या महिलांनी लुटला विविध कार्यक्रमाचा आनंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांसाठी विविध उपक्रम राबविणार्‍या जिव्हाळा ग्रुपचा शहरात मकर संक्रातीनिमित्त हळदी-कुंकूचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्राची लोकपरंपरा व संस्कृतीचा जागर करीत महिलांचा हा कार्यक्रम रंगला होता. मराठमोळ्या वेशभुषेत या कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.


ओम गार्डन येथे प्राजक्ता अमोल जाधव, अलकाताई मुंदडा व ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अल्पना कासवा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला होता. यामध्ये महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. लावणी व पारंपारिक गीतांवर महिलांनी ठेका धरला होता. तर उखाण्यातून महिलांना नाव घेताना महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला. महिलांना विविध वस्तू वाण स्वरूपात देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


अल्पना कासवा म्हणाल्या की, महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने दोन वर्षापुर्वी जिव्हाळा ग्रुपची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. यामध्ये शहराच्या विविध भागातील महिला सदस्या आहेत. ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात येतात. वर्षातील हा शेवटचा कार्यक्रम पार पडला असून, महिला दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असल्याची त्यांनी माहिती दिली.


प्राजक्ता जाधव व अलकाताई मुंदडा यांनी ग्रुपच्या कार्याचे कौतुक करुन महिलांना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजन, कौशल्यात्मक व बौध्दिक स्पर्धा रंगल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. चंदूकाका सराफ अ‍ॅण्ड सन्सच्या वतीने महिलांना वाणचे वाटप करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी सोडत काढून आकर्षक बक्षिसं देण्यात आली.


नवीन वर्षासाठी सभासद नोंदणी सुरु असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन जिव्हाळा ग्रुपच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता काळे यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *