• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

मतिमंद मुलीच्या गुप्तांगावर चटके देण्याच्या प्रकाराची चौकशी व्हावी

ByMirror

Oct 7, 2022

सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष महापुरे यांची मागणी

अमानवी घटनेचा योग्य तपास न झाल्यास उपोषणाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर येथील अनुदानीत मुकबधीर निवासी विदयालयात शिकणार्‍या सात वर्षीय मतिमंद मुलीच्या गुप्तांगावर चटके देण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.


दिव्यांग मुलगी वारंवार लघवी करते, म्हणुन तिच्या गुप्तांगावर ज्वलनशिल द्रव्य टाकून जखमी करण्याचा प्रकार उघड झाला असून, याबाबत मुलीच्या पालकांनी संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये शाळेच्या मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शासनमान्यं अनुदानीत संस्थेमध्ये शिकणारे विदयार्थ्यांच्या पालकत्वाची सर्वस्वी जबाबदारी ही संस्थेची व तेथील मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची आहे. त्यांच्यावर मुलांच्या आरोग्याची सर्वस्वी जबाबदारी असते. सदर गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करुन, संस्था दोषी आढळून आल्यास संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

घडलेला प्रकार निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषीवर प्रशाकिय कारवाई करण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधीतांवर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

दिव्यांग मुलांच्या जिवावर लाखो रुपयाचे अनुदान लाटणार्‍या संस्थाचालकांना जर दिव्यांगाचे वावडे असेल तर त्यांनी अशा संस्था बंद कराव्यात घडलेला प्रकार निंदनीय असून, याबाबत संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करुन दोषी असणार्‍यावर कठोर कारवाई होईपर्यन्त संघटना शांत बसणार नाही. -बाबासाहेब महापुरे (अध्यक्ष, सावली दिव्यांग संघटना)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *