हरदिन मॉर्निंग ग्रुप, बौध्द ज्येष्ठ नागरिक संघ, फिनिक्स फाऊंडेशन, माता रमाई महिला मंडळ आणि भिंगार मधील सामाजिक संघटनांच्या वतीने बुध्द पौर्णिमा साजरी
करुणा व अहिंसेचे ज्ञान देऊन भगवान गौतम बुध्दांनी मानवजातीला प्रकाशमार्ग दाखविला -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- करुणा व अहिंसेचे ज्ञान देऊन भगवान गौतम बुध्दांनी मानवजातीला प्रकाशमार्ग दाखविला. त्यांनी दिलेली नीतिसूत्रे अंगिकारल्यास खर्या अर्थाने समाजातील अंधकार दूर होणार आहे. राजेपण, राजवाडा आणि भव्य राज्याचा त्याग करुन गौतम बुध्दांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले. क्षमा, शांती, त्याग, सेवा व समर्पण ही त्यांनी दिलेली शिकवण आदर्श जीवन जगण्यास प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले.

हरदिन मॉर्निंग ग्रुप, बौध्द ज्येष्ठ नागरिक संघ, फिनिक्स फाऊंडेशन, माता रमाई महिला मंडळ आणि भिंगार मधील सामाजिक संघटनांच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त भिंगार मधील जॉगिंग पार्क मध्ये असलेल्या तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या भव्य पुतळ्यावर पुष्पांचा वर्षाव करुन अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमात सपकाळ बोलत होते. याप्रसंगी धम्म मित्र दिपक अमृत, संजय भिंगारदिवे, जालिंदर बोरुडे, सोपान साळवे, डॉ. सिता भिंगारदिवे, रमेश त्रिमुखे, विठ्ठल लोखंडे, सर्वेश सपकाळ, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, दिपक धाडगे, विकास भिंगारदिवे, मनोहर दरवडे, दिपक घोडके, अशोक पराते, दिलीप गुगळे, पवन वाघमारे, अब्बास शेख, संजय भिंगारदिवे, उषा ठोकळ, संगीता दरवडे, मिनाक्षी खोगरे, रोशनी वाघमारे, हर्षाली भोसले आदी उपस्थित होते.
पुढे सपकाळ यांनी जॉगिंग पार्क मध्ये असलेल्या तथागत भगवान गौतम बुध्द यांचा पुर्णाकृती पुतळा हा जिल्ह्यातील सर्वात उंच पुतळा आहे. पुतळ्याचे राहिलेले सुशोभिकरणाचे काम आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पुर्ण केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. धम्म मित्र दिपक अमृत यांनी बौध्द धर्म, भगवान गौतम बुध्दांचे विज्ञान व मानवतावादी विचार, त्यांचे तत्त्वज्ञान आणि धम्मचक्रप्रवर्तन यावर मार्गदर्शन केले.