कोरोनाच्या अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद -छायाताई फिरोदिया
100 टक्के गुण मिळवणारी स्वराली शित्रे ठरली प्रथम, अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्केच्या पुढे गुण
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. तिन्ही शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेच्या वतीने करण्यात आला.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त सुनंदा भालेराव, अॅड. गौरव मिरीकर, भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, अशोकभाऊ फिरोदियाचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, रूपीबाई बोराचे मुख्याध्यापक अजय बारगळ यांच्यासह शालेय शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात समृध्दी बिबवे म्हणाल्या की, कोरोना काळातील ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालाचा अंदाज बांधणे कठीण होता. पण विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन मिळवलेले यश नेत्रदीपक आहे. निकाल कसा लागणार?, याची देखील शिक्षकांना काळजी होती. विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून संस्थेचे व शाळेचे नाव उज्ज्वल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, शाळेतील दहावीच्या निकालाचा सुखद धक्का लागला. अपेक्षेपेक्षा अधिक चांगला निकाल लागला आहे. कोरोनाच्या अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. विविध विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी असून, एका विद्यार्थिनीने शंभर टक्के गुण मिळवून शाळेची गुणवत्ता सिध्द केली आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम व अध्यापक व पालकांची साथ आणि मार्गदर्शनाने हे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक क्षेत्र खुले असून, विचारपूर्वक निर्णय घेऊन आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
या गौरव सोहळ्यात इयत्ता दहावी मधील शालेय गुणवत्ता यादीत चमकलेल्या पुढील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल प्रथम- स्वराली शित्रे (100), द्वितीय- गौरवी ठाणगे (98.80), तृतीय- वैष्णवी शहाणे (97.20), श्रावणी चोथे (97.20), चौथी- दिव्या काकडे (96.60), पाचवी- साक्षी आंधळे (96.60), संकेत चौधरी (96.40), सहावा- धीरज मुठे (96.20), सातवा- अथर्व पांढरे (96.00), आठवी- अनुष्का बार्शीकर (95.80), तसेच संस्कृत मध्ये 28, गणित मध्ये 3, विज्ञान व समाज अभ्यास मध्ये प्रत्येकी 1 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले.
अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम- अनुश्री काबरा (95.40), द्वितीय- सौरभ जगदाळे (93.80), तृतीय- प्राजक्ता कुलकर्णी (92.00), चौथी- श्रेया चोभे (91.60), पाचवी- सानिका जावळे (91.20), विषयातील टॉपर श्रेया तनपुरे (इंग्रजी 92 गुण), अमन बोरगे (संस्कृत/हिंदी 94 गुण), आदित्य जायभाय (मराठी 91 गुण), समर्थराजे कुलट (गणित 98 गुण), निखील पंड्या (सोशल सायन्स 94 गुण).
रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल प्रथम- गायत्री गुंड (95.00), द्वितीय- प्रतिक्षा मिसाळ (90.60), तृतीय- समृध्दी लोखंडे (89.80), चौथा- अलोक श्रीमाळ (89.40), पाचवा- गणेश गव्हाणे (89.20), सहावी- दिव्या जावळे (87.80), सातवी- सानिका निमसे (87.60), आठवा- वसिम शेख (87.40), नऊवी- आदिती आठरे (87.00), दहावी- सृष्टी दानी (87.00). विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या नावांची घोषणा राजेंद्र उगले यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नंदा उजागरे यांनी केले. आभार वैशाली वाघ यांनी मानले.