• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

बीडीएस अभावी प्रलंबित मंजुरी प्रदान करून आवश्यक निधी द्यावा -बाबासाहेब बोडखे

ByMirror

Oct 12, 2022

शिक्षक परिषदेची राज्य सरकारला मागणी

दीपावली या महत्त्वाच्या सणापूर्वी बंद पडलेली बीडीएस प्रणाली तात्काळ सुरू व्हावी

अहमदनगर (प्रतिनिधी)- बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे शिक्षक कर्मचारी यांना हक्काच्या आर्थिक लाभापासून वंचित रहावे लागत असून, आर्थिक वर्ष 2021-22 मधील बीडीएस अभावी प्रलंबित मंजुरी प्रदान करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


21 मार्च 2022 पासून बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे कर्मचारी त्यांच्या हक्काच्या आर्थिक लाभापासून वंचित आहेत. या प्रकरणी शिक्षण आयुक्त (पुणे) यांना अनेकवेळा पत्र पाठवून कार्यवाही करण्याची विनंती केली होती. परंतु अद्याप पर्यंत कारवाई झाली नसल्याचे शिक्षक कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


दीपावली या महत्त्वाच्या सणापूर्वी बंद पडलेली बीडीएस प्रणाली तात्काळ सुरू करण्याचे आदेश द्यावे, तसेच आर्थिक वर्ष 2021-22 मधील बीडीएस अभावी प्रलंबित देयकांना मंजुरी प्रदान करून आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याचे बोडखे यांनी म्हंटले आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *