• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

प्रा. होले यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मुख्याध्यापक, शिक्षकांची मागणी

ByMirror

Mar 2, 2023

मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील शिक्षक शिवाजी किसन होले यांच्या मारेकर्‍यांचा शोध लावण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.2 मार्च) जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले.


यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, मुख्याध्यापक संघाचे सचिव बाबासाहेब शिंदे, दीपक जाधव, भाऊराव नाडेकर, रमाकांत दरेकर, अवधुत आहेर, सुनिल पंडित, रंगनाथ जगधने, देवीदास पालवे, डी.व्ही. शिंदे, ज्ञानदेव बेरड, प्रा. रविंद्र देवढे, एम.एम. कांडेकर, सिताराम जपकर आदींसह शिक्षक उपस्थित होते.


पाच दिवसापूर्वी प्रा. शिवाजी किसन होले यांचा अज्ञात मारेकर्‍यांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला आहे. अद्यापही या हत्येचा तपास लागलेला नसून, नेप्ती परिसरात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. केडगाव बायपास परिसरात 23 फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी पिस्तुलातून गोळ्या झाडून प्रा. होले यांचा खून केला. एका निष्पाप शिक्षकाचा बळी गेल्यामुळे संपूर्ण शिक्षक परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात कधी घडू नये, असे निवेदनात म्हंटले आहे.


प्रा. होले यांच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जिल्ह्यातील शिक्षक वर्गाच्या वतीने करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *