कार्यक्रमातून पाणी बचतीचा व मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. तसेच मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
समता परिषदेचे नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच जालिंदर शिंदे, शाखा अध्यक्ष शशिकांत होले, पोलीस पाटील अरुण होले, भानुदास फुले, संतोष बेल्हेकर, सार्थक होले, मिलिंद होले, संतोष शिंदे, सुरेश कदम, दादू चौगुले, महेंद्र चौगुले, विनायक बेल्हेकर, ऋषी मेहेत्रे, गणेश भोळकर, दत्ता होळकर, गोपीनाथ होळकर, राजू कर्डिले, चंद्रकांत जपकर, गुलाब राऊत उपस्थित होते.
तसेच गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ही मोठ्या उत्साहात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सुरेश कार्ले यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक सावता बनकर यांचे महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान झाले. याप्रसंगी पाणी बचतीचा व मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थितांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास योगेश पवार, विजय बेल्हेकर, ज्ञानदेव चौगुले, मीना नायगावकर, नुतन पाटोळे, राजश्री कोल्हे, रखमाबाई जपकर आदी उपस्थित होते.