छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानाचा इतिहास प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोगरे, उद्योजक रामदास डोंगरे, गणेश भगत, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे, वैभव पवार, कृष्णा डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, संभाजी महाराजांचे कार्य व स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास प्रेरणादायी आहे. युवकांना प्रेरणा मिळण्यासाठी महापुरुषांचा इतिहास ज्ञात असला पाहिजे. इतिहास घडविणारी माणसे इतिहासामधून प्रेरणा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.