अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्वर दिंडीचे नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
दिंडीतील वीणेकरी ह.भ.प. बबन महाराज गुंजाळ व ह.भ.प. विनायक महाराज काळे यांचा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी सत्कार केला. तसेच दिंडीतील वारकर्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, नामदेव फलके, भागचंद जाधव, बापू येवले, दगडूभाऊ कावरे, बापू ढोणे, ग्रामपंचायत सदस्य मल्हारी गुंजाळ, सिताराम येवले, भरत बोडखे, बाळू फलके, अंशाबापू येवले, बन्सी जाधव, किशोर बोडखे, नाना फलके, श्याम जाधव, सोनू फलके, तुकाराम फलके, संतोष फलके, दिपक बोडखे, राम जाधव आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.