• Wed. Jan 22nd, 2025

तायक्वांदोच्या राष्ट्रीय पंच परीक्षेत नगरचे 8 प्रशिक्षक उत्तीर्ण

ByMirror

Jun 28, 2022

इंडिया तायक्वांदो राष्ट्रीय फेडरेशनने घेतली परीक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया तायक्वांदो या अधिकृत राष्ट्रीय फेडरेशनद्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पंच परीक्षेत नगरचे 8 प्रशिक्षक उत्तीर्ण झाले. यामध्ये तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन अहमदनगरचे जिल्हा सचिव व ज्येष्ठ मार्गदर्शक घनश्याम सानप, नारायण माळी, गणेश वंजारी, योगेश बिचितकर, युवराज लोखंडे, मयूर अडागळे, प्रिया शिंदे यांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले असून, रेफ्री रिफ्रेशर प्रशिक्षणात नारायण कराळे यांनी यश संपादन केले.


राष्ट्रीय पंच परीक्षा नुकतीच सातारा येथे इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून 80 तज्ञ प्रशिक्षकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. आंतरराष्ट्रीय पंच असलेले गोव्याचे पिटर सर व मुंबईच्या उषा मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. यावेळेस तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आबा झोडगे, महासचिव संदीप ओंबासे, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सातारा जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे गफ्फार पठाण, तुषार औटी हजर होते.


अहमदनगर जिल्ह्यातून अधिकृत तायक्वांदो संघटना तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत सदरील आठ जणांनी ही राष्ट्रीय पंच परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. सर्व यशस्वी राष्ट्रीय पंचांचे शहराचे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महानगरपालिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृहनेते कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक स्वप्निल शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *