• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या वतीने शहीद बाबा दीप सिंहजी यांची जयंती साजरी

ByMirror

Jan 28, 2023

भाविकांसह मुकबधीर विद्यार्थी व कुष्ठधाम मधील वृध्दांना लंगरचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहीद बाबा दीप सिंहजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या (जी.एन.डी.) वतीने तारकपूर भागात भाविकांना, तर सावेडी येथील मुकबधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना व कुष्ठधाम येथील वृध्दांना मिष्टान्न भोजन व फळांचे (लंगर) वाटप करण्यात आले.


आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लंगर सेवेचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमोल गाडे, उद्योजक जनक आहुजा, तेजेंद्रसिंह बेदी, संजय आहुजा, राज गुलाटी, रामसिंग कथुरिया, कुमार मास्टर, किशोर कंत्रोड, डॉ. संजय असणानी, अवतार गुरली, बबलू खोसला, विकी कंत्रोड, बाबा कर्नलसिंह, चंद्रकांत गाडे आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुरुनानक देवजी सेवा ग्रुप समाजात सेवाभावाने कार्य करत आहे. धार्मिक उपक्रमात नेहमीच ग्रुपच्या वतीने सेवा दिली जाते. शहीद बाबा दीप सिंहजी यांचे बलिदान सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांनी सत्य व धर्मासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.


जनक आहुजा म्हणाले की, गुरु गोविंदसिंहजी यांच्या प्रेरणेने बाबा दीप सिंहजी यांनी धर्मासाठी दिलेले बलिदान समाजाला प्रेरक आहे. अन्याय, अत्याचार विरोधात त्यांनी लढा दिला. समाजात एक वीर योध्दा म्हणून ते पुढे आले. तर धर्मासाठी त्यांनी आपले बलिदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *