• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

ऐतिहासिक चांदबिबी महालावरुन लोक कर्कासूर आणि न्याय कर्कासूराचा कडेलोट

ByMirror

Jan 28, 2023

अनागोंदी, टोलवाटोलवी व भ्रष्टाचार संपविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेची मोहिम

समाज शोषकांना कायमचे संपविण्यासाठी नागरिकांना लोकशाही गितास्त्र स्विकारण्याचे आवाहन

आफताब शेख अहमदनगर – येथील ऐतिहासिक चांदबिबी महालावरुन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने आंदोलनाद्वारे लोक कर्कासूर आणि न्याय कर्कासूर यांचा सूर्यसाक्षीने कडेलोट करण्यात आला. शासन, प्रशासनातील अनागोंदी, टोलवाटोलवी व भ्रष्टाचार संपविण्यासाठी आणि समाज शोषक असलेल्या समाजातील लोक कर्कासूर आणि न्याय कर्कासूरांना कायमचे संपविण्याची हाक देत हे आंदोलन करण्यात आले होते.


समाजशोषक प्रवृत्तींना डिच्चू कावा तंत्राने समाजातून हद्दपार करण्यासाठी आंदोलकांनी यावेळी प्रतिकात्मक कबड्डी खेळ खेळला. यावेळी संबळच्या निनादात जय शिवाजी, जय डिच्चू कावाच्या घोषणा देण्यात आल्या. लोक कर्कासूर आणि न्याय कर्कासूर मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.


भारतीय संविधानाबरोबरच गीतेतील तत्वज्ञान उन्नत चेतनेच्या आधारे प्रत्यक्ष रितीने राबविण्यासाठी नागरिकांना लोकशाही गितास्त्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, रईस शेख, सुनिल सकट, राजू सय्यद, राजेंद्र गोसावी, दत्तात्रय आवारी, चंद्रकांत कोल्हे, विलास दानवे, सुरज भद्रे, रोहित तेलतुंबडे, नामदेव घुले, पोपटराव साठे, जयदेव शिरसाठ, अशोक डाके, बबलू खोसला, ज्ञानेश्‍वर चौधरी, बबन बडदे, अशोक ढाकणे, एस.टी. ढोबळे, ओम कदम, आसिफ शेख, अंकुश निर्मळ, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, विठ्ठल सुरम, दिलीप जाधव, पोपट भोसले, किशोर शेरकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


गीतेमधील तत्वज्ञान भगवान श्रीकृष्ण यांनी युध्द भूमीवर अर्जुनाला सांगितले. त्याचा गाभा म्हणजे निरंतर राष्ट्रीय कर्तव्य योग समाज कंटकांचा नाश आणि सज्जनांना संरक्षण देण्याचा आदेश होय. राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा दुसरे काहीएक श्रेष्ठ नाही, हेच गीतेचे सूत्र आहे. गीता ही धर्मनिरपेक्ष आहे. आज भारतीय संविधान आणि कायदे राबविण्याच्या कामात भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवा टोलवी निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय निरंतर कर्तव्य योग म्हणजे गीतास्त्र प्रत्येक नागरीकाने स्विकारण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.


अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, भारतीय संविधानाला गीतास्त्राची जोड दिल्यास भारतातील लोकशाही उन्नत होईल आणि त्याचवेळेला खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक राबविले जाईल. तमाम जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्याच्या कामात समाजातील लोक कर्कासूर आणि न्याय कर्कासूर यांनी फार मोठी अडचण निर्माण केली आहे. सामाजिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी कायद्याचे आणि न्यायाचे राज्य राबविण्याची गरज आहे. परंतु भारतात आज मागच्या दाराने सत्तेत येणारे व्होट माफिया मतं खरेदी करतात. कोंबडी, दारुचा वापर करुन पुढील पाच वर्षे जनतेच्या तिजोरीतील पैश्यावर डल्ला मारतात. त्याचवेळी देशातील न्यायपालिकेमध्ये न्याय खरेदी विक्री आणि वारी न्यायालय निर्माण झाली आहेत. त्यातून स्वातंत्र्याची 75 वर्षे संपली, परंतु देशातील जनतेला स्वातंत्र्याची फळे मिळालेली नाही. त्यामुळे जाहीर रितीने लोक कर्कासूर आणि न्याय कर्कासूर यांचा कडेलोट करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


अशोक सब्बन म्हणाले की, व्होट माफिया समाजातील खरे समाजकंटक आहेत. त्यांच्यामुळेच मतदारांना कोंबडी, दारु सक्तीने घ्यावयास भाग पाडणार्‍या व्होट माफियांचे हसून स्वागत करावयास हरकत नाही परंतु अशा समाज कंटकांचा निवडणुकीमध्ये डिच्चूकावा केल्याशिवाय जनतेला पर्याय नाही. लोक कर्कासूर आणि न्याय कर्कासूर पोसले गेले आहेत. त्यांचा कडेलोट करुन त्यांना इशारा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *