• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करीत साजरा

ByMirror

Jan 5, 2023

मागील चार वर्षापासून समाजात योग, प्राणायामाचा प्रचार-प्रसाराचे कार्य

आयुर्वेदाप्रमाणे योग-प्राणायाम अथांग सागराप्रमाणे -डॉ. ज्योती तनपुरे-चोपडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करीत साजरा करण्यात आला. मागील चार वर्षापासून आनंद योग केंद्राच्या माध्यमातून योगाचा प्रचार-प्रसार सुरु असून, नागरिकांसाठी निशुल्क योगाचे वर्ग घेऊन समाजात आरोग्याप्रती जागृतीचे कार्य केले जात आहे.


सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात झालेल्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त 150 साधकांच्या उपस्थितीत झालेल्या योग शिबिरात स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्याप्रती जागृक राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आयुर्वेद तज्ञ डॉ. ज्योती तनपुरे-चोपडे यांच्या हस्ते झाले. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख दिलीप कटारिया, चंद्रशेखर सप्तर्षी, प्रतीक्षा गीते, संगीता जाधव, पूजा ठमके, स्वाती वाळुंजकर, सुभाष भंडारी, निहाल कटारिया, बाळू गांधी आदी उपस्थित होते.


डॉ. ज्योती तनपुरे-चोपडे आयुर्वेदातील सिद्धांत सांगताना म्हणाल्या की, आयुर्वेदाप्रमाणे योग-प्राणायाम अथांग सागराप्रमाणे आहे. आयुर्वेदाचे व योगचे शाश्‍वत सिद्धांत आहेत. आयुर्वेदाने स्वास्थ्य पुरुषाची व्याख्या सांगितली आहे. तर योग शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी मदत करतो. पुरुषार्थाची प्राप्ती करण्यासाठी उत्तम स्वास्थ्ययुक्त देह आवश्यक आहे. देहाचे आरोग्य राखण्यासाठी अन्न हे महत्वाचे घटक आहे. आहार हा शरीराची झीज भरून काढून शरीराचे पोषण व संवर्धन करतो. आहार हेच औषध समजून घेण्याबाबतची संकल्पना त्यांनी समजून सांगितली. तर व्याधी निर्माण झाल्यास ते आयुर्वेद शास्त्राने कसे बरे होतात यावर सविस्तर त्यांनी मार्गदर्शन केले. आयुर्वेद शास्त्राची कास धरुन सोन्याप्रमाणे शरीराचे आरोग्य जपण्याचे त्यांनी आवाहन केले.


दिलीप कटारिया म्हणाले की, योग व प्राणायामाने निरोगी जीवन जगता येते. नित्यनियमाने योग करणार्‍यांचा कोरोना लवकर बरा होऊन, त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली नाही. कोरोनानंतर समाजामध्ये आरोग्यबाबत जागृकता निर्माण झाली असून, युवक-युवती, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक देखील योग वर्गाकडे वळाले आहेत.

स्वास्थ्य जीवन जगण्यासाठी योग जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे त्यांनी आवाहन केले. चंद्रशेखर सप्तर्षी यांनी निरोगी आरोग्य व तणावमुक्तीसाठी योग, प्राणायाम व ध्यानधारणा आवश्यक आहे. संस्थेच्या माध्यमातून शुभ मंगल कार्यालयात सकाळ, संध्याकाळ होत असलेल्या योग वर्ग घेतले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *