• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुसला जाणार्‍या भाविकांची आरोग्य तपासणी

ByMirror

Jan 12, 2023

आरोग्याबाबत जागृक न राहिल्यास शेवटी मोठ्या आजाराला तोंड देण्याची वेळ -डॉ. शाहीन शेख

अहमदनगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या 811 व्या उरुसला जाणार्‍या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी शहरातून भाविकांना घेऊन जाणारे यात्रेचे समन्वयक फजल शेख, मोहसीन मिर्जा, नदिम शेख, शेख बाबर चांद कादरी, हुसेन कादर शेख आदी उपस्थित होते.


अजमेर (राजस्थान) येथे मोठ्या उत्साहात उरुसची तयारी सुरु असून, छट्टी शरीफ रविवार 29 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी अहमदनगर शहरातून मोठ्या संख्येने भाविक या उरुसमध्ये सहभागी होणार आहेत. भाविकांना थेट अजमेरला जाण्यासाठी रेल्वे अथवा खासगी वाहनांची पुरेशी सुविधा नसल्याने शहरातून विशेष खासगी लक्झरी बसने जाण्यासाठी अल्पदरात सात दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत सहभागी झालेल्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना या शिबिरात आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


डॉ. शाहीन शेख यांनी भाविकांची आरोग्य तपासणी केली. यावेळी वेलनेस कोच समी शेख व अब्दुल सत्तार उपस्थित होते. डॉ. शेख म्हणाल्या की, तणावामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. तणावपूर्ण जीवनशैली असणार्‍यांनी नियमित आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.

आरोग्याबाबत जागृक न राहिल्यास शेवटी मोठ्या आजाराला तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगून उपस्थितांना आरोग्यासाठी आहार, व्यायाम व मेडिटेशनबद्दल मार्गदर्शन केले. या शिबिरात उपस्थितांची मधुमेह, रक्तदाब, कॅलरी तपासणी करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *