• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात सांधे विकार व अस्थी व्यंग विकाराच्या उपचार शिबीराला प्रतिसाद

ByMirror

Sep 11, 2022

उमंग फाउंडेशनचा उपक्रम

निरोगी जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद -डॉ. संतोष गिर्‍हे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. तंत्रज्ञानाच्या युगात गुरफटलेल्या मनुष्याला आयुर्वेदचा स्विकार करण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनात योग, प्राणायाम व ध्यानाचा अवलंब केल्यास निरोगी जीवन जगता येणार असल्याचे प्रतिपादन सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी केले.


उमंग फाउंडेशनच्या वतीने शहरात सांधे विकार व अस्थी व्यंग विकारावर उपचार शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी अ‍ॅड. बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे, सचिव वैशाली कुलकर्णी, चांद शेख, पो.कॉ. इलियास शेख, शिवाजी सोनवणे, सुमन सोनवणे, बाळू सोनवणे, लीला सोनवणे, ऋतिक सोनवणे, नयना बनकर, अ‍ॅड. महेश शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. संतोष गिर्‍हे म्हणाले की, निरोगी जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद जीवनमान बदलल्याने आजार व व्याधी वाढल्या आहेत. आयुर्वेदच्या माध्यमातून अनेक असाध्य रोगावर नियंत्रण मिळवून ते कायमचे नष्ट करता येतात. विविध व्याधींवर मोठ्या प्रमाणात औषधोपचार करुन फरक न पडल्यास शेवटी आयुर्वेदकडे वळताना अनेक रुग्ण दिसत असून, आयुर्वेदातून शंभर टक्के लाभ रुग्णांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजू गायकवाड यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. गायकवाड यांनी सामाजिक भावनेने उमंग फाउंडेशन व्यसनमुक्ती, पर्यावरण व आरोग्यावर करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. डॉ. गिर्‍हे यांनी रुग्णांची तपासणी केली. आभार वैशाली कुलकर्णी यांनी मानले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *